नसरापूर पीडितेच्या नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी नवले ब्रिज केला बंद, अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज मृत पीडितेचे नातेवाईक आणि शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने कात्रज-देहू रोड बाह्यवळण मार्गावरील नवले पूल पूर्णपणे रोखून धरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा नवले पूल परिसरात दाखल झाला आहे. संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

दरम्यान, पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर आज तिचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत होते. मात्र, जोपर्यंत नराधम आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही आणि या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

Comments are closed.