पुण्यातील टोळीयुद्धात संपलेला आयुष कोमकर कोण? मामाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भाच्याला गोळ्या

पुणे : एका वर्षापूर्वी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची हत्या झाली, त्याच ठिकाणी बदला म्हणून 20 वर्षांच्या भाच्याला गोळ्या घालून संपवलं. पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्धामध्ये गोविंद उर्फ आयुष कोमकर या 20 वर्षांच्या युवकाची हत्या करण्यात आली. आयुष कोमकर हा कुख्यात गुंड गणेश कोमकरचा मुलगा आहे. तर गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे.

मंगळवारी रात्री नाना पेठ परिसरात हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली . गणेश कोमकर या 20 वर्षांच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष कोमकर क्लासमधून येत असताना घराच्या बेसमेंटजवळ ही हिंसक घटना घडली. ही हत्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. गणेश कोमकर आणि संजीवनी कोमकर हे दोघेही वनराज आंदेकर हत्या प्रकरणी (वानराज अंदेकर खून प्रकरण) मुख्य आरोपी आहेत.

आयुष कोमकर कोण होता: आयुष कोमकर एक कोन असेल?

आंदेकर कुटुंबातील प्रमुख बंडू आंदेकर याची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी होती. त्याला वनराज आणि संजिवनी अशी दोन अपत्यं. संजिवनी हिचं लग्न जयंत कोमकर याच्याशी झालं. जयंत कोमकर हा गणेश कोमकरचा सख्खा भाऊ. याच गणेश कोमकरचा मुलगा म्हणजे आयुष कोमकर. आयुष कोमकर हा 20 वर्षांचा असून महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

एका जमिनीच्या वादातून आंदेकर आणि कोमकर या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर 1 सप्टेंबर 2024 रोजी, संजिवनी कोमकरने तिचा सख्खा भाऊ असलेल्या वनराज आंदेकरची हत्या केली. या प्रकरणा आयुष कोमकरचा बाप असलेल्या गणेश कोमकरलाही अटक करण्यात आली.

टोळी-युद्धाची पार्श्वभूमी

वनराज आंदेकर हत्या: 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक करण्यात आली. आयुष कोमकरचा वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलीस तपासातून उघड झालं.

वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती? त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर रोजी प्लॅनही आखला होता. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला.

भाच्याची हत्या करून बदला घेतला

गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नाना पेठेमध्ये गोळ्यांचा आवाज झाला. एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डीजे सुरू होता, त्यामध्ये ‘टपका रे टपका, एक ओर टपका’ हे गाणं सुरू होतं. त्याचवेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजे आयुष कोमकरला ठार केलं. या घटनेनंतर पोलीस कारवाई सुरू आहे. मात्र या दोन्ही टोळ्यांतील वाद शमेल असं वाटत नाही.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.