वैष्णवी हगवणेंची हत्या की आत्महत्या? राजेंद्र हगवणे अजितदादांचे जवळचे म्हणून अटक नाही का?
पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे (Vaishanvi Hagawane Suicide Case) यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वैष्णवी हगवणे यांची हत्या नसून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला. तसेच त्यांना हुंड्यासाठी छळलं जात होतं, मारलं जात होतं असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. राजेंद्र हगवणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही हा दावा चुकीचा असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. राजेंद्र हगवणेंच्या शोधात पोलिसांची तीन पथकं रवाना केल्याची माहिती बावधन पोलिसांनी दिली.
Rajendra Hagawane News : हुंड्यासाठी वैष्णवी यांचा छळ
राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष आहेत. त्यामुळेच सून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी त्यांना अटक होत नाही या चर्चेत तथ्य नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं. वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला. आत्महत्येपूर्वी त्यांचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, मारहाण केल्याचं समोर आले. वैष्णवी यांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
Pune Crime News : वैष्णवी यांचे पती, सासू, नणंद पोलिसांच्या ताब्यात
सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिरेवर गुन्हा दाखल आहे. यापैकी पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आली आहे. तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात सध्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिसेरा राखून ठेवला असून तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली.
Vaishanvi Hagawane Suicide Case : राहत्या घरी आत्महत्या
वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी (16 मे) घरात बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा न उघडल्याने त्यांनी तो दरवाजा तोडला. त्यानंतर ही घटना समोर आली. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे की, वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली. मारहाण व जाच करून तिच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरले आहेत.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.