पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार?

पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 : पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनीच युती कधी होणार आणि जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार, सोबतच उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? या सर्व प्रश्नांकडे लक्ष लागलंहे. असे असताना भाजपने मात्र काही ठराविक उमेदवारांना मध्यरात्री एबी फॉर्म (AB forms) दिले आणि उमेदवारांना प्रचार सुरू करायला सांगितलं आहे.

दरम्यानपुण्यात भाजपने (Pune Bjp)165 पैकी 100 जागा निश्चित केल्या होत्या. ताशी यादी तयार केली होती. आता त्याच यादीतील 60-80 उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म दिले आहेत. एकीकडे भाजप-शिवसेनेच्या युती बाबत शंका असताना, जागावाटावरून तडजोडी सुरू असताना भाजप आपला सेफगेम खेळून पक्क्या उमेदवारांना प्रचारासाठी मोकळीक करून दिली आहे.

Pune Bjp : भाजपाचा पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज आज होणार दाखल

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा अर्ज आज दाखल होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरजजी घाटे उपस्थित राहणार आहेत.

Municipal Corporation Election 2026 : महापालिका निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

हे ही वाचा –

Pimpri Chinchwad Election 2026 : पवारांचा ‘पिंपरी पॅटर्न’ तयार; अजित दादांचा मास्टरस्ट्रोक, 128 जागांपैकी 110 जागा लढणार?, युती–मविआचा प्लॅन ‘होल्ड’वर

आणखी वाचा

Comments are closed.