पुण्यात काँग्रेससच्या माजी मंत्र्यांचा मुलगा भाजपात; प्रशांत जगतापांविरुद्ध निवडणूक लढवणार

पुणे बातम्या : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे (Mahapalika Election)  बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसमधे दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांच्या विरोधात वानवडी भागातील प्रभागातून अभिजित शिवरकरांना भाजपकडून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये सातत्याने पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. अशातच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळं पुण्या तकाँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

पुणे शहराच्या विकासासाठी भाजपसोबत : अभिजीत शिवरकर

भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर बोलताना अभिजीत शिवरकर म्हणाले की, 2007 ला सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून गेलो होतो. वानवडी भागातून मी अनेक कामे केली आहेत. 14 वर्षाचा वनवास संपवून आज भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे अभिजीत शिवरकर म्हणाले. अनेकजण माझे सहकारी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. मी समाजकारण राजकारण केले आहे, जिथ होतो तिथे एकनिष्ठ होतो, आता भाजपमध्ये देखील एकनिष्ठ राहणार असल्याचे मत अभिजीत शिवरकर यांनी व्यक्त केले. पुणे शहराच्या विकासासाठी भाजप सोबत गेल्याची माहिती अभिजीत शिवरकर यांनी दिली.

महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले

महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले आहे. भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. आज काँग्रेससह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपने मोठा धक्का दिला आहे. भाजपमध्ये इनकमिंगची लाट कायम असल्याचे चित्र आहे. माजी उपमहापौर आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप बराटे आणि काँग्रेस नेते अभिजित शिवरकर यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दिलीप बराटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जातात. वारजे परिसरात त्यांची मजबूत संघटनात्मक ताकद असून स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला वारजे भागात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.