आंदेकर टोळीचा आधीचा प्लॅन फसला; पण रात्री आयुष जागेवर गेला..; गँगवॉरमध्ये सख्खा भाचाही पाहिला न

पुणे : शहरात एकीकडे गणरायाला निरोप देण्याची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे काही जण बदला घेण्यासाठी तयारी करत होते. गणेश मंडळात संध्याकाळी विसर्जनाच्या आदल्या दिवशीची आरती झाली, काही वेळ आधीच पोलिसांनी आढावा घेतला, त्यानंतर रात्री आठच्या आसपास नाना पेठ परिसरात गोळीबाराचा मोठा आवाज झाला. राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्याच्या सख्या भाच्याचा गोळ्या झाडून खून केला. पण, ही हत्या होण्याआधी आंदेकर टोळीने ४ दिवसांआधी असाच प्रयत्न केला होता.

एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना टोळीयुध्दाची घटना पुण्यात घडली आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची आंदेकर टोळीने काल (शुक्रवारी) गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना नाना पेठ परिसरात घडली आहे. 1 सप्टेंबर 2024 मध्ये याच परिसरात वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतर आंदेकर टोळीने आयुषवर गोळ्या झाडून खून केला. आयुष हा क्लासवरून आला होता, पार्किंगमध्ये असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

4 दिवसांपूर्वी प्लॅन फसला

दरम्यान या घटनेच्या चार दिवस आधी म्हणजे,1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने एक प्लॅन रचला होता. पण याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनीही सगळ्यांवर नजर ठेवली आणि आंदेकर टोळीचा पहिला डाव हाणून पाडला. कृष्णा आंदेकरने एक रूम भाड्याने घेण्यासाठी 5000 रुपये देऊन काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवलं होतं. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेनं वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींच्या घराचे रेकी केली. त्याची माहिती काळेने कृष्णाला व्हॉट्सॲप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असं काळेला कळवलं. मात्र, अमन आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेनं परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. कृष्णा फोनच उचलत नसल्याचं पाहिल्यावर काळे याने यश पाटील याला कॉल केला. त्यावेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो, असं कळवलं होतं. पाटीलने कॉल केल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता काळेला कॉल केला गेला. त्यावेळी सात ते आठ जणांना पाच हत्यारं घेऊन पाठवलं आहे, असं सांगितलं होतं. तर अमनने कॉल करून ‘लक्ष ठेवा बाहेर आला की कळवा’ असं कळवलं होतं. पण पोलिसांनी तो डाव हाणून पाडला.

त्या दिवशी गेम चुकला पण रात्री सापडला

मात्र, पोलिसांना या प्लॅनची टीप मिळाली होती. पोलिसांनी नजर ठेवली काहींना पकडले. त्यामुळे हा डाव फसला होता. पण आंदेकर टोळी कुणाला मारणार होते, हे तेव्हा नेमकं कळलं नाही. पण, काल(शुक्रवारी) 1 सप्टेंबर रोजी अखेर आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली.

आणखी वाचा

Comments are closed.