आयुष कोमकरला संपवण्यासाठी आंदेकर टोळीला कोणी मदत केली? कल्याणी कोमकरने FIRमध्ये दिली महत्त्वाची
पुणे : गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील नाना पेठ परिसरात गॅंगवार उसळला. यात माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेत आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा खून केला. आरोपींनी 11 गोळ्या झाडल्या, त्यातील तीन गोळ्या आयुषला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. “टपका रे टपका” या गाण्यावर ठेका धरत आरोपींनी 19 वर्षीय आयुषवर बेभान गोळीबार केला. या घटनेनंतर आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान आणि यश सिद्धेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सोसायटीत दबा धरून गोळीबार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आला होता. तो तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आरोपी अमन खान आणि यश पाटील यांनी दबा धरून थेट पिस्तुलातून गोळीबार केला. हा कट बंडू आंदेकर आणि इतर आरोपींनी रचल्याचं फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी आरोपी अमन खान, यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. आरोपींनी आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून केला. आयुष याच्या खुनाचा कट बंडू आंदेकर, तसेच अन्य आरोपींनी रचला. त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांनी मदत केली, असे आयुष कोमकर याची आई कल्याणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
अतिक्रमण कारवाईतून वैर वाढलं
दरम्यान, वनराज आंदेकरच्या सांगण्यावरून महापालिकेने दुकानावर अतिक्रमण कारवाई केल्याचा राग कोमकर गटात होता. त्यातूनच खुनाचा कट रचल्याचं समोर आलं आहे. आंदेकर टोळीतून बाहेर पडलेल्या सोमनाथ गायकवाड आणि त्याचा साथीदार निखिल आखाडे यांचेही नाव या वादात जोडले गेले. नाना पेठेत आंदेकर टोळीने आखाडेची हत्या केली होती. त्याचा बदला घेण्यासाठीच गायकवाड व साथीदारांनी आंदेकरांच्या खुनाची योजना आखल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं.
एफआयआर मध्ये काय म्हटलंय?
आयुषच्या आईने कल्याणी गणेश कोमकरने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की,दिनांक 01/09/2024 रोजी वनराज आंदेकर याचा खुन झाला होता, या खुनाच्या संशयावरुनच माझे पती गणेश कोमकर, दिर प्रकाश कोमकर व जावु संजिवनी हे येरवडा जेलमध्ये आहे. वनराज आंदेकर याचा खुन झाल्यापासुन आंदेकर टोळीतील लोक बदला घेण्यासाठी आमचेवर पाळत ठेवुन असतात. दिनांक 05/09/2025 रोजी सायंकाळी 04/45 वा. सुमारास माझा लहान मुलगा आर्णव कोमकर हा ए.डी. कॅम्प चौक पुणे येथे सलीम सर यांच्याकडे ट्युशनसाठी गेला होता, त्याची ट्युशन सायंकाळी 07/00 वा. सुटत असल्याने माझा मोठा मुलगा आयुष हा त्याला घेण्यासाठी ए.डी. कॅम्प चौकामध्ये अॅक्टीव्हा गाडी घेवुन गेला. मी सायंकाळी 07/30 वा. सुमारास घरामध्ये एकटीच असताना मला बिल्डींगमधील अश्विनी व दुडम काका यांनी फोन करुन कळविले की, तुमचा मोठा मुलगा आयुष याला कुणीतरी मारहाण केली आहे. म्हणुन मी बिल्डींगच्या खाली जाऊन बघितले असता पार्कीगमध्ये लोकांची गर्दी होती तसेच माझा मोठा मुलगा आयुष हा रक्तबंबाळ अवस्थेत पार्कीगमध्ये जमीनीवर पडलेला होता.
माझा लहान मुलगा अर्णव हा रडत होता, मी त्यास आयुषला कुणी मारले आहे? याबाबत विचारले असता तो मला बोलला की, “दादा व मी ट्युशन सुटल्यानंतर आपल्या अॅक्टीव्हा गाडीवरुन पार्कीगमध्ये आलो, मी गाडीच्या खाली उतरलो व दादाने गाडी पार्क केली, तितक्यात आमच्या पाठीमागुन पार्कीगमध्ये दोन मुले पळत आले. आयुषकडे बघत असताना त्या दोघांनी त्यांच्याकडील पिस्टलने आयुषवर समोरुन फायरींग केली त्यामध्ये पिस्टलमधील बुलेट हा आयुषला लागुन आयुष हा खाली पडला असल्याचे सांगितले.”
आयुषला जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने आमच्या बिल्डींगमधील पार्कीगमधील नारायण क्लिनीकचे डॉ. राकेश अंकम यांना बोलाविले असता, त्यांनी माझा मुलगा आयुष यास चेक करुन त्यास पुढील उपचारकामी ससुन हॉस्पीटल येथे जाण्यासाठी सांगितले. थोड्याच वेळात तेथे अॅम्बलुन्स व पोलीस आले. माझा मुलगा आयुष यास अॅम्बुलन्स मधुन घेवुन आम्ही उपचारकामी ससुन हॉस्पीटल येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन तो मयत झाल्याचे घोषीत केले. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर मला, माझा मुलगा आर्णव व पुतणी अक्षदा कोमकर यास आमच्या पार्कीगमधील बिल्डींगचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी दाखविले असता, त्यामधील दोन मुलांना बघुन त्यांनीच माझा मुलगा आयुषवर पिस्टलने फायरींग करुन जिवे ठार मारले असुन मी त्यांना ओळखले असुन त्यांची नावे अमन पठाण व यश पाटील असे आहे.
सदरची मुले ही बंडु आण्णा आंदेकर टोळीसाठी काम करीत असुन वनराज आंदेकर याचे खुनाचा बदला घेण्यासाठीच आंदेकर टोळीमधील 1) बंडु आण्णा आंदेकर 2) कृष्णा आंदेकर 3) शिवम आंदेकर 4) तुषार वाडेकर (5) स्वराज वाडेकर (6) अभिषेक आंदेकर 7) वृंदावनी वाडेकर 8) शिवराज आंदेकर 9) लक्ष्मी आदेकर यांनी संगनमताने कट रचुन इसम नामे 10) अमन युसुफ पठाण उर्फ खान, रा. 09, नानापेठ, डोके तालीमजवळ पुणे 11) यश सिध्देश्वर पाटील, रा. डोके तालीमच्या पाठीमागे, नानापेठ पुणे यांनी माझ्या मुलावर पिस्टलने फायरींग करुन खुन केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=6hz5q7u5Miu
आणखी वाचा
Comments are closed.