कात्रजच्या भारती विद्यापीठ परिसरात गुंडांचा हैदोस, हॉटेल चालकाला मारहाण, दुचाकी पेटवली
पुणे : सध्या पुण्यामध्ये गुंडगिरी वाढताना दिसत असून त्याचाच एक भाग कात्रज भारती विद्यापीठ परिसरामध्ये पाहावयास मिळाला. भारती विद्यापीठ परिसरात एका हॉटेलच्या बाहेर 15 ते 20 तरुणांमध्ये वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या हॉटेल मालकाला या गुंडांनी मारहाण केली आणि पेट्रोल टाकून त्याची दुचाकी पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंडांच्या टोळक्यात वाद सुरू असताना हॉटेल चालकने त्यांना हॉटेलच्या बाहेर जाऊन भांडण करावीत, हॉटेलमध्ये भांडण करू नये अशी विनंती केली. त्यानंतर त्या टोळक्यांकडून, गुंडाकडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. गुन्हेगारी टोळके एवढ्यावरच थांबले नाही. काही वेळाने हॉटेल चालक ससून रुग्णालयात मेडिकलसाठी जात असताना त्याला रस्त्यातच अडवून बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर पेट्रोल टाकून त्याची दुचाकी देखील जाळली.
हॉटेल चालकाला मारहाण केल्यानंतर आरोपींनी पेट्रोल टाकून त्याची गाडी पेटवून दिली. यावेळी जमलेल्या सर्व नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. पुढे जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. पुण्यातील कात्रज भागात या टोळक्याकडून परिसरात भीतीचे वातावरण, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.