पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, कुंटणखान्यांवर धाड, प्रत्येक गल्
पुणे गुन्हे बुधवार पेठ: पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याला (Pune Police) निलंबित करण्यात आले होते. बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली नाही. तसेच तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप ठेवत या महिला कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले होते. (Pune News)
या घटनेनंतर पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ अशा घटना थांबल्या पाहिजेत, यासाठी बुधवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे ठरवले. यानुसार, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिट चे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रात्री 12 वाजता मोठा फौजफाटा बुधवार पेठेत (Budhwar Peth) दाखल झाला. बुधवार पेठेत येणारे आणि जाणारे सर्व रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. शुक्रवार पेठ पोलिस चौकी जवळ असलेल्या सर्व कुंटणखान्यातील महिलांची महिला पोलिसांनी चौकशी केली. तसेच या ठिकाणी वावरत असलेल्या अनेक तरुणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. अमली पदार्थ तसेच जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करायला भाग पाडणे, बांगलादेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य या अनुषंगाने पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली.
यावेळी कुंटणखान्यातील मुलींची कसून चौकशी करण्यात आली. या कारवाईदरम्यान कुंटणखान्यातील 50 घरांची झडती घेण्यात आली. अमली पदार्थांसह, जबरदस्तीने अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात आहे का, याचा शोध या ऑपरेशनमध्ये घेण्यात आला. रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. यावेळी बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीबाहेर पोलिसांनी नाकाबंदी केली होती.
Pune news: पुण्याच्या उच्चभ्रू सोसायटीतील हुक्का पार्लरवर छापा
पुण्याच्या धनकवडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी छापा टाकून मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत हुक्का पॉट, चिलीम आणि विविध फ्लेवर्स असा 12 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्री गुरुनानक कृपा इमारतीच्या टेरेसवर हा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात अवैध हुक्का पार्लरवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
तर दुसरीकडे पुण्याच्या वारजे माळेवाडी परिसरातही पोलिसांकडून एक कारवाई करण्यात आली. याठिकाणी पोलिसांनी 15 बुलेट सायलेन्सरवर कारवाई केली. वारजे भागातील कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरची पोलिसांनी विल्हेवाट लावली. त्याचबरोबर ज्या गॅरेजवाल्याने असे सायलेनसर बसवले होते त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.