पहिले प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार, मग दुसऱ्यावर कोयत्याने वार, घायवळ टोळीचा माज वाढला; पोलिस
पुणे : पुण्यात अलीकडेच झालेल्या टोळीयुद्धानंतर आता सामान्य नागरिकांनाही गुंडांच्या दहशतीला सामोरं जावं लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरूड परिसरात कुख्यात निलेश घायवळ(nilesh Ghaywal) टोळीच्या सदस्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केला.गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ (Prakash Dhumal) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. सध्या त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही जीवघेणी कारवाई करण्यात आली.गोळीबार होताच जीव वाचवण्यासाठी प्रकाश धुमाळ जवळील एका इमारतीकडे धावले. यावेळी स्थानिक सचिन गोपाळघरे यांनी धुमाळ यांना मदत केली. घायवळ टोळीतील मयूर कुंबरे याने थेट गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान हा घटनेसह आरोपींना आणखी एका सामान्य नागरिकावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)
आम्ही इथले भाई आहोत
प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर याच आरोपींनी वैभव साठे या आणखी एका नागरिकावर कोयत्याने वार केलेत. प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे गुन्हेगार सागर कॉलनी या ठिकाणी गेले आणि तिथे उभ्या असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण हल्ला केला आहे. निलेश घायवळ टोळीतील हे गुन्हेगार हल्ला करताना “आम्ही इथले भाई आहोत” असं म्हणत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, पोलिसांचा धाक या आरोपींना उरला आहे की नाही असे सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत.
वैभव साठे याला कोयत्याने मारहाण केली
याप्रकरणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती देताना सांगितलं की, ही घटना काल रात्री कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी केवळ गोळीबार नाही केला तर अजून एकाला कोयत्याने मारहाण देखील केली आहे. काल रात्री या आरोपींनी दोन जणांना मारहाण केली आहे. काल रात्री १२ च्या दरम्यान गोळीबार घडला आणि त्यानंतर याच आरोपींनी अजून एका व्यक्तीला कोयत्याने मारहाण केली आहे. प्रकाश धुमाळ अस गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर वैभव साठे याला कोयत्याने मारहाण केली. चार आरोपी दोन गाड्यांवर आले आणि गोळीबार केला.
निलेश घायवळ याचा काही सहभाग आहे का याची चौकशी सुरू
आम्ही इथले भाई आहोत म्हणत गोळीबार केला. एक गोळी फायर केली होती आणि ती त्या इसमाच्या मांडीवर लागली. याच आरोपींनी रात्री अजून एकाला कोयत्याने मारत जखमी केलं आहे. हे सगळे घायवळ टोळीचे सदस्य आहेत. हे सगळे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत काल रात्री २ गुन्हे यांच्यावर दाखल केले आहेत. अनेक मोका आणि ३०७ या आरोपींवर याआधी दाखल आहेत. निलेश घायवळ याचा काही सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे. मयूर कुंबरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख आणि इतर काही आरोपींवर गुन्हा दाखल असून यांना ताब्यात घेतले आहेत. मारणे टोळीवर याआधी मोका लावला आहे यात देखील योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=n_ghbncscq0
आणखी वाचा
Comments are closed.