पुण्यात आंदेकर-कोमकर पुन्हा गँगवॉर भडकले, रिक्षा चालकाला भरदिवसा कोयत्याने संपवलं
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (पुट मर्डर) पुन्हा एकदा गँगवॉरमधून एकाची हत्या करण्यात आली आहे. कोंढवा भागात गणेश काळे या रिक्षा चालकाचा गोळीबार आणि कोयत्याने वार करुन त्याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपी फरार झालेत. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून (आंदेकर कोमकर टोळीयुद्ध) ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हत्या झालेला गणेश काळे हा कोमकर टोळीचा सदस्य असलेल्या समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे ही हत्या गँगवॉरमधून झाल्याची चर्चा आहे.
पुणे आंदेकर टोळी: आंदेकर टोळी अजूनही सक्रिय
आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सह अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं या हत्येतून दिसून येतंय.
आणखी वाचा
Comments are closed.