10वीच्या मुलावर खासगी क्लासमध्ये चाकूने वार, उपचारादरम्यान मृत्यू वडील म्हणाले, ‘गणिताचा क्लास

राजगुरूनगर/ पुणे: पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये दहावीतील मुलाची हत्या (Pune Crime News) झाली, मित्रानेच खासगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच गळा चिरुन तो पसार झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. तर हल्ल्यात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं की, माझ्या मुलाची हत्या (Pune Crime News) करणाऱ्या मुलाने तीन दिवसांपूर्वी ही त्याला मारहाण केली होती. त्याचवेळी शिकवणीच्या शिक्षकांनी माहिती द्यायला हवी होती. असं झालं असतं तर माझा एकुलता एक मुलगा आज माझ्यासोबत असता, असं उद्विग्न झालेल्या वडिलांनी म्हटलंय. माझ्यावर आलेली वेळ इतर कोणावर येऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी वडिलांनी केली आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: आज सकाळी तो क्लासला गेला होता

या घटनेबाबत मृत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, आम्हाला कल्पना नाही. तीन ते चार दिवसांपूर्वी चार-पाच मुलांनी मिळून त्याला मारलं होतं आणि आज सकाळी तो क्लासला गेला होता. मला आमच्या आईचा साडेनऊ वाजता फोन आला तू लवकर दवाखान्यात जा. मुलांची काहीतरी भांडण झालेली आहेत, त्यानंतर मी दोन ते तीन दवाखाने शोधले, त्यानंतर मला सांगण्यात आलं की, सरकारी दवाखान्यामध्ये या, मी तिथे गेलो पण मला त्याची अवस्था बघवत नव्हती, तीन महिन्यापूर्वी वाद झाला असल्याची काहीही कल्पना मला नाही, मात्र तीन-चार दिवसांपूर्वी त्याला मारहाण करायला काहीजण आले होते, कशावरून झालं आणि काय झालं याचं नेमकं कारण अद्याप आम्हालाही माहिती नाही.

Pune Crime News: आज माझ्यावर जी वेळ आली आहे ती वेळ कोणावरही येऊ नये

पोलीस याचा तपास करत आहेत,पोलिस तपासानंतरच आम्हालाही कारण कळेल, पण आमची फक्त एकच विनंती आहे तीन चार दिवसापूर्वी त्याला मारणारी मुलं आणि आज ज्याने हल्ला केला तो मुलगा जोपर्यंत यांना अटक केली जात नाही. तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. आज माझ्यावर जी वेळ आली आहे ती वेळ कोणावरही येऊ नये इतकंच माझं म्हणणं आहे, या प्रकरणात पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य करावे इतकंच आमचं म्हणणं आहे, तीन-चार दिवसांपूर्वी क्लासचा बाहेर वाद झाला होता, आणि आज जे घडलं ते शिक्षक शिकवत असताना घडलं, गणिताचा त्रास सुरू होता आणि शिक्षक शिकवताना हा हल्ला झाला आहे, तो बेंचवरती बसलेला असताना त्याला मारला आहे, असंही हल्ला झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं आहे.

Pune Crime News: तीन महिन्यांपूर्वीची भांडणं कळवलं असती तर घटना टळली असती…

पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये दहावीतील मुलाची हत्या झाली, मित्रानेच गळा चिरला आणि तो पसार झाला आहे. पण या दोघांमध्ये तीन महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं, त्याचवेळी पोलिसांना याबाबत कळवलं असतं. तर कदाचित ही घटना घडली नसती, असं डीवायएसपी अमोल मांडवे यांनी माहिती दिली आहे. हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केलेत, शिकवणीमध्ये एका बेंचवर बसलेले असताना ही धक्कादायक घटना घडली. आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरु आहे. पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलांसोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवं. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत? ते फावल्या वेळेत काय करतात? कुठं बसतात? याची माहिती पालकांनी ठेवावी, असं आवाहन ही पोलिसांनी केलं.

Pune Crime News:  खासगी क्लासमध्ये शिकवणी सुरू असतानाच चाकू काढला अन्…

आज सकाळच्या सुमारास खासगी कोचिंग क्लासेस हा रक्तरंजित थरार झाला आहे. या क्लासेसमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्याच्या आधीच्या वादातून मित्रावरच चाकूहल्ला केला. शिक्षक शिकवत असताना हा भयंकर प्रकार घडला. या विद्यार्थ्याने चाकूने मित्राचा गळा चिरला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्य झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

एका विद्यार्थ्याने क्लासमध्येच मित्रावर जीवघेणा हल्ला केला आणि तो तिथून फरार झाला. शिक्षक शिकवत असताना अचानक हा मुलगा उठला त्याने सोबत आणलेला चाकू बॅगेतून काढला आणि शेजारीच बसलेल्या दुसऱ्या मित्रावर वार केला. या मुलाने मित्राचा गळा चिरला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेला आणि हल्ला करणारा हे दोघेही दहावीचे विद्यार्थी आहेत.

Pune Crime News: हल्ला करणारा मुलगा पोलीस स्टेशनला हजर झाला होता, प्रत्यक्षदर्शीचा दावा

दहावीतील मुलाची हत्या करणारा त्याचा मित्र खेड राजगुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता. असा दावा प्रत्यक्षदर्शी वैभव घुमटकर यांनी केलाय. प्रत्यक्षात पोलीस मात्र हल्ला करणारा मुलगा पसार झाल्याचं सांगतायेत. त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळावला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाशेजारी हल्ला करणारा उभा होता, तिथून तो थेट पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. असा दावा प्रत्यक्षदर्शीने केलाय.

आणखी वाचा

Comments are closed.