धक्कादायक! पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या, मावळ हादरलं, परिसरात तीव्र संतापाची लाट
गुन्हे बातम्या ठेवा: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. फक्त पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही चिमुकली घरातून अचानक बेपत्ता झाली होती.
माहिती मिळताच पिंपरी–चिंचवड पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आई कामावरुन घरी आल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याचे तीच्या लक्षात आले. माहिती मिळताच पिंपरी–चिंचवड पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. प्राथमिक तपासात उघड झाले की, घरात अनेकदा एकटी राहणाऱ्या चिमुकलीचा फायदा घेत समीर कुमार मंडळ (वय 30 ते 35 विवाहित) या आरोपीने तिला घराजवळच काही अंतरावर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी चौकशीत संपूर्ण घटना उघडकीस आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या अमानुष कृत्यामुळे मावळ परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune Crime News: मोठी बातमी! पुण्यातील व्यावसायिक नितीन गिलबिले हत्या प्रकरणात फरार माजी नगरसेवकावर ‘मकोका’, नेमकं प्रकरण काय?
आणखी वाचा
Comments are closed.