पुण्यातील अप्पर बिबवेवाडीत एका तरुणावर कोयत्याने वार; दांडियामध्ये झाला होता किरकोळ वाद
गुन्हे बातम्या ठेवा पुणे: पुण्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दांडियामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून पुण्यातील अप्पर बिबवेवाडी येथे एकावर कोयत्याने वार (Pune Crime News) करण्यात आला. जखमीवर ससून रूग्णालयात उपचार सुरू असून गौरव सोनकांबळे असे वार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सर्व विधि संघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काल (19 ऑक्टोबर) सायंकाळी घटना घडली. सदर प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तसेच तीनही अल्पवयीन आरोपीना पोलिसांनी घेतले ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.
पु्ण्यातील दुसरी धक्कादायक घटना- (Pune Crime News)
पुण्याच्या चाकण येथे महामार्गालगत सांडपाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेज चे काम सुरू असताना या कामाचे काँक्रीट स्लॅब कोसळून एक मजूर स्लॅब खाली अडकला. नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला. चाकणच्या तळेगाव चौकात स्त्याच्या कडेला टाकलेले गटारावरील काँक्रीट कोसळल्याने एक मजूर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. रस्ता रुंदीकरण करताना रस्त्यालगत गटरवर टाकण्यात आलेला काँक्रीट स्लॅब कोसळला. रात्री टाकलेला स्लॅब ताजा असतानाही त्याखालचे आधार काढताना स्लॅब कोसळून त्याखाली हसन अन्सारी हा मजूर अडकून पडला. त्यात तो किरकोळ जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी त्याला काँक्रीट वरील स्टील वर उचकटून वाचविले. महामार्गाचे रुंदीकरण करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूने ड्रेनेज लाईन चे काम सुरु असून ठेकेदार कामाकडे दुर्लक्ष करीत असून हे काम घाईघाईने करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.काँक्रीट टाकून तो सुकला ही नाही तर मजुराने स्लॅबचा आधार काढल्याने हा स्लॅब कोसळण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.