मागून येऊन तोंड दाबलं, गळा दाबत मागे नेऊन लैंगिक अत्याचार केला अन्…, पोलिसांकडून चाकण अत्याचा

पुणे: पुण्यातील चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या तरूणीला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 13 मेच्या रात्री 11 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नराधम आरोपी प्रकाश भांगरेला चोवीस तासांत बेड्या ठोकण्यात आल्या आहे. 27 वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती. एका कंपनीत ही पीडित हेल्पर म्हणून काम करायची. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने एका इमारतीच्या मागील बाजूस ओढून नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने प्रतिकार केला, आरोपीला चावा ही घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं. महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात चाकण पोलिसांना यश आलं. तो सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला आहे, मात्र तो मूळचा आहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने याआधी असे काही कृत्य केलंय का? याचा तपास ही केला जातोय.

दोघांचा यापूर्वीचा कोणताही परिचय नव्हता

अत्याचाराच्या घटनेबाबात पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त, शिवाजी पवार यांनी माहिती देताना सांगितलं की, “ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तरूणी रात्रपाळीसाठी कामावर जात होती. एका पॉईंट पर्यत त्यांना पायी जावं लागतं, त्या ठिकाणी पिक अप पॉईंटपर्यंत जात असताना आरोपीने पाठलाग केला, एका ठिकाणी त्याने मागून येऊन तोंड दाबलं, त्यानंतर गळा दाबत तिला एका कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान त्या रस्त्यावर दोघे जण जात होते, त्यानंतर त्या तरूणीने त्यांना पाहून मोठ्याने आरडाओरडा केला, त्यानंतर तो आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर एका कपलने त्या तरूणीची मदत केली, पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

दोघे एकमेकांना ओळखत नव्हते

चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पिडीत तरूणीला तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केलं. आरोपीचे नाव प्रकाश भांगरे आहे, मुळचा तो आहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहे. त्या दोघांचा यापूर्वीचा कोणताही परिचय नव्हता. दोघे एकमेकांना ओळखत नव्हते, दोघांच्या कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत. ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला, सर्व पथकांनी 18 ते 19 तास तपास करून तांत्रिक बाबीचा आधार घेत आरोपीचा शोध घेतला, अटकेपासून वाचण्यासाठी तो लपून बसलेला होता, मात्र, स्थानिक माहितीच्या आणि तांत्रिक बाबींच्या आधारे त्याला अटक घेण्यात यश आलं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.