वनराज आंदेकरच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा
पुणे : शहर परिसरात गणेशोत्सवानिमित्त रस्तोरस्ती, गल्लोगली, सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून येत आहे. तर दुसरीकडे विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर काल(शुक्रवारी) पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस (Pune Police) अधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातून रूट मार्च काढला, सर्व परिस्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर अवघ्या दोन तासांनंतर नाना पेठेत टोळीयुद्धाचा भडका उडाला, आणि रक्तरंजित थरार दिसून आला. आंदेकर टोळीचा आधारस्तंभ व माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा वर्षभरापूर्वी म्हणजेच एक सप्टेंबरला खून करण्यात आला होता. त्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर (Ganesh Komkar) याच्या मुलाचा आयुष गणेश कोमकर (Ayush Komkar) याचा काल (शुक्रवारी) रात्री पावणेआठच्या सुमारास गोळ्या घालून खून करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा खून आंदेकर टोळीने केला आहे. दोघांनी मिळून त्याला पार्किंगमध्ये गोळ्या घातल्या.
18 वर्षीय आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर याचा राहत्या घराच्या परिसरातील पार्किंगमध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला. आयुष महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तो क्लासवरून घरी आला, पार्किंगमध्ये होता तेव्हा त्याच्यावर हल्ला झाला, काल (शुक्रवारी) रात्री नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रूग्णालायत दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. घटनेनंतर आरोपी पसार झाले. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीच्या काळामध्ये झालेल्या या खुनामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहरात गेल्या एका आठवड्यापासून ‘वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला’ याविषयीची चर्चा सुरू होती. या प्रकरणी रेकी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, भारती विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे बदल्याचा एक कट उधळण्यात आला होता. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली; तसेच खुनाच्या कटात सहभागी असलेल्यांची नावेही समोर आली होती. आंदेकर टोळीच्या सदस्यांना पाच पिस्तुले पुरवण्यात आली होती. त्यातील दोन पोलिसांनी जप्त केली. तर, तीन पिस्तुले आणि आरोपींचा शोध सुरू होता. त्यापूर्वीच नाना पेठेमध्ये ही खुनाची घटना घडली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या खुनामुळे पुणे शहरात भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा गेला बळी
गणेश कोमकर याची पत्नी कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची मुलगी आहे. ती वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे. वनराजच्या खुनानंतर आंदेकर-कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदेकर-गायकवाड संघर्षात बंडू आंदेकरच्या नातवाचा बळी गेला. 18 वर्षांचा आयुष क्लासवरून घरी परतला असताना त्याच्यावर पार्किंगमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या.
अंदेकरच्या मारेकरीच्या खुनाचे वन्यजीव प्रशासन
1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकर याचा नाना पेठेत डोके तालीम परिसरात कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोम्या गायकवाड, गणेश कोमकर आणि इतर आरोपी होते. वनराज आंदेकरच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन केलं होतं, त्याचबरोबर खुनाचा बदला घेण्याची शपथ देखील घेतल्याची माहिती आहे. ही माहिती शहर पोलिस दलातील अधिकाऱ्यांना आणि गुन्हे शाखेलाही होती. त्यानुसार वनराज आंदेकरच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होत असताना, भारती विद्यापीठ परिसरात आंदेकर टोळीने एकाच्या खुनाचा कट रचला होता. तो कट भारती विद्यापीठ पोलिसांमुळे उधळून लावण्यात आला होता. मात्र, नाना पेठेतील कट पोलिसांना उधळता आला नाही यामध्ये 18 वर्षांचा आयुष कोमकर बळी गेला.
https://www.youtube.com/watch?v=2nf6xdz-iky
आणखी वाचा
Comments are closed.