आयुष कोमकर गाडी पार्क करायला गेला, हल्लेखोर धावत गेले अन् गोळ्या झाडल्या, पुणे गँगवॉरनं हादरलं

पुणे क्राइम पुणे: पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरु असताना पुण्यातील नाना पेठ येते भर गर्दीत विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भर वस्तीत गँगवॉर पाहायला मिळालं.यात एका 19 वर्षीय तरुणाच मृत्यू झाला आहे. पुण्यातील नाना पेठ येथील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे संध्याकाळच्या वेळेस ही धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणात 19 वर्षीय आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (Ayush Alias Govind Komkar) याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.गणेश कोमकर याच्यावर 3 गोळ्या झाडत त्याची हत्या करण्यात आली आहे.

आयुष उर्फ गोविंद कोमकरला कसं संपवलं?

पुण्यातील नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्लेक्समध्ये पार्किंगमध्ये तीन ते चार जण आले. त्यांनी गोळीबार केला, यात आयुष कोमकर जखमी झाला. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यात आयुष उर्फ गोविंद कोमकरचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नाना पेठ आणि आजू बाजूच्या परिसरात तणावाचं वातावरण आहे.

वनराज आंदेकर (Vanraj Andekar) राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक होता, त्याच्यावर गोळ्या झाडून गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 ला हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी गणेश कोमकर तुरुंगात आहे. आज त्याचा मुलगा आयुष ऊर्फ गोविंद कोमकर याच्यावर गोळीबार करण्यात आला.

गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचं गोळ्या घालून खून करण्यात आलं होत.या प्रकरणात गणेश कोमकर यांना अटक करण्यात आली होती.गेल्या काही दिवसांपासून वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू होती आणि याबाबत पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे कट रचल्याबाबत एकाला अटक केली होती आणि 6 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलं होतं.मात्र आज विसर्जनाच्या पूर्वसंध्येला वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याच्या मुलावर म्हणजेच आयुष कोमकरवर तीन गोळ्या झाडत हत्या करण्यात आली आहे.

वनराज आंदेकर याच्या हत्या प्रकरणात गणेश कोमकर सध्या तुरुंगात आहे. त्याच गणेश कोमकर याचा मुलगा आयुष ऊर्फ गोविंद कोमकर हा 19 वर्षांचा होता. कुटुंबासह तो या परिसरात राहतो. पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्यासाठी गेला असता दोन ते तीन लोकं धावत आले आणि गोळीबार केला. यानंतर आयुष कोमकरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी तपास सुरु केला आहे, मात्र कोणत्याही आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं नाही.

https://www.youtube.com/watch?v=bjeja4k-dgs

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.