आयुष कोमकर हत्या प्रकरण! पुणेकरांना खाली मान घालायला लावणारी घटना, काय म्हणाले राजकीय नेते?
गुन्हेगारीची बातमी ठेवा: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष कोमकर (Ayush Komkar) याच्यावर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. यामुळं गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी भाजप आमदार हेमंत रासने आणि शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र दंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांनी दिली आहे.
पुण्यातील हत्या प्रकरणी बोलताना आणदार हेमंत रासने म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जे काही घडलं आहे, त्याला पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी माहिती रासने यांनी दिली आहे. तर गणेशोत्सवाला असं गालबोट लागायला न पाहिजे होतं. पुण्याचा गणेशोत्सव हा जगाला साक्ष देणारा उत्सव आहे. या उत्सवात अशी घटना घडणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र दंगेकर यांनी दिली. पुणेकरांना खाली मान घालायला लावणारी ही घटना आहे. पोलिसांनी अशा लोकांचा बंदोबस्त करावा असं दंगेकर म्हणाले.
नेमकी कशी घडली घटना?
पुण्यातील नाना पेठेत गोविंदा कोमकर (Govinda Komkar) याच्यावर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. आंदेकर टोळीकडून वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याच्या हत्येचा बदला एका वर्षात गोविंदा कोमकर याच्या हत्या करत घेण्यात आल्याचा संशय आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 ला पुण्यात वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. त्याच्या हत्येचा बदला आंदेकर टोळीनं घेतल्याचं म्हटलं जातंय. मागील वर्षी ज्याची हत्या झाली तो वनराज आंदेकर आणि आज ज्याची हत्या झाली तो गोविंदा कोमकर हे सख्खे मामा – भाचे आहेत. वनराजच्या हत्या प्रकरणात आज ज्याची हत्या झाली त्या गोविंदाचे वडील गणेश , काका जयंत आणि काकू संजीवनी हे तुरूंगात आहेत. गोविंदा हा संजीवनी कोमकरचा पुतण्या, गणेश कोमकरचा मुलगा आहे.
काय म्हणाले पोलीस?
याबाबत सविस्तर माहिती पुणे गुन्हे शाखा उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. रात्री पावणेआठच्या सुमाराला आयुष कोमकर या युवकाची क्लासमधून परत आल्यावर अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखा उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या सहा टीम रवाना
आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गणेश कोमकर हे वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरचा भाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या सहा टीम रवाना करण्यात आल्या आहेत. काही लीड्स मिळाले असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=bjeja4k-dgs
महत्वाच्या बातम्या:
Pune Crime : वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला, गोविंदा कोमकरचा तीन गोळ्या झाडत खून, गँगवॉरमध्ये मामाच्या हत्येचा बदला भाच्याच्या हत्येनं, पुणे हादरलं
आणखी वाचा
Comments are closed.