पुण्यातील बाजीराव रोडवर भर दुपारी रक्तरंजित थरार! मित्रांनी केलेली चूक बेतली तरूणाच्या जिवावर,
पुणे: शहरातील गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढताना दिसत असून (Pune Crime News) गेल्या काही दिवसांत खुनांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशातच, काल (मंगळवारी ता. ४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास वाहतुकीने गजबजलेल्या बाजीराव रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाचा थरारक खून झाला. भरदिवसा या मुलाच्या डोक्यात आणि तोंडावर वार करून त्याचा खून (Pune Crime News) करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून, तिघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण (Pune Crime News) पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या तीन दिवसांत पुण्यात भरदिवसा झालेला हा दुसरा खून आहे. काही दिवसांपूर्वीच गणेश काळे नावाच्या रिक्षाचालकाची निर्घृण हत्या झाली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Pune Crime News)
Pune Crime News : तीन आरोपींना तोंडाला मास्क लावून तीन आरोपी.
मयंक सोमदत्त खराडे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक आणि त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे (वय १८, रा. दांडेकर पूल) बाजीराव रस्त्यावरील टेलिफोन भवन येथून दुचाकीने महाराणा प्रताप उद्यानाकडे येत होते. त्या वेळी मास्क लावून तोंड झाकलेले तीन आरोपी एकाच दुचाकीवरून आले. त्यांनी मयंक खराडे याच्या डोक्यात व तोंडावर शस्त्राने सपासप वार केले. भांडणात मध्यस्थी करणारा मयंकचा मित्र अभिजित याच्यावरही आरोपींनी कोयत्याने वार केले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
Pune Crime News : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जलद गतीने तपास सुरू
पर्वती पायथ्याजवळील जनता वसाहतीतील सुरू असलेल्या टोळीयुद्धाचा उग्र स्वरूपात उद्रेक झाला असून, मंगळवारी (दि. ४) दुपारी तीनच्या सुमारास बाजीराव रस्त्यावरील नातूबाग परिसरात एका अल्पवयीन तरूणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शहराच्या मध्यवस्तीत, ऐन रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जलद गतीने तपास करत तिन्ही आरोपींना पकडले. हल्ल्यात मयंक (वय १७) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हल्ला इतका भयंकर होता की, ते दृश्य पाहून नागरिकांचा थरकाप उडाला.
Pune Crime News : घटनेच्या आधी दोन दिवसांपूर्वी त्याच्या मित्रांनी एका तरुणाला मारहाण
मयंक हा मूळचा जनता वसाहत परिसरातील रहिवासी असून, त्याची आई पुणे महापालिकेत कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना महापालिकेच्या साने गुरुजी वसाहतीत राहण्यासाठी खोली मिळाल्याने कुटुंब तिथे स्थलांतरित झाले. मात्र, मयंकचा वावर पूर्वीप्रमाणेच जनता वसाहतीत अधिक होता. गेल्या दोन वर्षांत या परिसरात टोळीयुद्धाची तीव्रता वाढली असून आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे, तर दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत. मयंकचा स्थानिक काही गुंडांशी वाद झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्याच्या मित्रांनी एका तरुणाला मारहाण केली होती. त्यामुळे तेथील काही जण त्याच्या मागावर होते. त्यातून वैर वाढून मयंकचा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
आणखी वाचा
Comments are closed.