नुकतंच मिसरुड फुटलेल्या पोरांना गँगमध्ये घ्यायचा, त्यांच्याकडून सुपारी वाजवायचा, बंडू आंदेकरच्य

पुणे : आयुष कोमकर (Ayush Komkar) खून प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या १३ आरोपींपैकी तब्बल सात आरोपी हे १९ ते २५ या वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर (Bandu Andekar) (वय ७०) हा तरुणांना टोळीत सामील करून संघटित गुन्ह्यांचे कट रचण्यात निष्णात असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सोमवारी अटक केलेल्या १० आरोपींना विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आयुष कोमकर (वय १८) याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक केली होती. त्यानंतर बंडू आंदेकरसह शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, रा. नाना पेठ) यांना गुजरातमधील द्वारका येथे रविवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यांना स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन सोमवारी पुण्यात हजर करण्यात आले.

सरकारी वकील विलास पठारे यांनी सांगितले की, आंदेकर टोळीने खून करण्यामागे दोन महत्त्वाचे मुद्दे हेतू आणि कट  यावर सखोल तपास आवश्यक आहे. आरोपींनी वापरलेली पिस्तूल कोणी पुरवले, सराव कोठे केला, तसेच गुन्ह्यानंतर पुरावे म्हणून महत्त्वाचे ठरू शकणारे कपडे व जाकीट फेकून दिल्याची माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने चौकशी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, आरोपींनी आयुष कोमकरवर किती वेळा नजर ठेवली, त्याला लक्ष्य करण्यासाठी आधीही प्रयत्न झाले का, हेही पोलिस तपासत आहेत. फरार आरोपी कृष्णा आंदेकर याचा शोधही सुरू आहे. आरोपींच्या घरातून जप्त केलेले मोबाइल, पेनड्राईव्ह, रोख रक्कम, दागदागिने व कागदपत्रांची चौकशी समक्ष घेण्यात येणार आहे.न्यायालयाने सर्व १० आरोपींना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कृष्णा आंदार फरार

आरोपींच्या घराची झडती घेतली असून, त्यामध्ये मोबाइल, पेनड्राइव्ह, रोख रक्कम, दागदागिने, तसेच काही कागदपत्रे याबाबत त्यांना समक्ष विचारून तपास करायचा आहे, तसेच यातील फरार कृष्णा आंदेकर याचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यात वापरलेली पिस्टल कोणी पुरवली, तसेच पिस्टल चालविण्याचा सराव कोठे केला, याचा तपास करायचा आहे अशी माहिती त्यांनी न्यायालयात दिली आहे.

आरोपी हे १९ ते २५ वयाचे

सरकारी वकील विलास पठारे यांनी सांगितले की, आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकर ७० वर्षांचा असून, यातील ७ आरोपी हे १९ ते २५ वयोगटातील आहेत. बंडू आंदेकर याने या युवकांना संघटित गुन्हेगारीकरिता कट रचून त्यांच्याकडून १८ वर्षाच्या युवकाचा अमानवीयरीत्या निघृण खून केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.