पुण्याच्या नवनियुक्त पोलीस उपायुक्तांनी पदभार स्वीकारताच केली धडक कारवाई; बुधवार पेठेतून 13 महि
पुणे: पुण्यातील बुधवार पेठेतील बांगलादेशी महिलांच्या विरोधात पोलीस आक्रमक झाले आहेत. नवनियुक्त पोलीस उपायुक्त कृषिकेष रावले यांनी याबाबत कारवाई सुरू केली आहे. रावले यांनी (Pune Crime News) पदभार स्विकारल्यानंतर दोन कारवायांमध्ये 13 बांगलादेशी महिला ताब्यात घेतल्या आहेत. दोन कारवायांमध्ये पोलिसांनी बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तब्ब्ल 13 महिलांना ताब्यात घेतले आहे.फरासखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर याआधी 2 जुलै रोजी झालेल्या कारवाईत आठ बांगलादेशी महिलांना बुधवार पेठेतून ताब्यात घेतले होते. (Pune Crime News)
या महिलांविरोधात निर्बंध आदेश लागू करण्यात आले असून त्यांना बांग्लादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारतात अवैधरित्या वास्त्यव्यास असलेल्या पाच बांगलादेशी महिलांना बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामधून पकडण्यात आले. जहानारा माजिद शेख (वय 45), शिल्पी बेगम रबिउल्ला शेख (वय 28), नुसरत जहान निपा (वय 28), शिल्पी खालेकमिया अक्तर (वय 38, सर्व रा. मालाबाई वाडा, बुधवार पेठ) आणि आशा खानामइयर अली (वय 30, रा. कात्रज) अशा पकडण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची नाव आहेत.
दरम्यान, यापूर्वी 2 जुलै रोजी फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेतील ढमढेरे गल्ली येथील आशा बिल्डिंग याठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांनी काही बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले होते. फरासखाना पोलिसांच्या पथकासह एटीएसचे पथकही या कारवाईत सहभागी झाले होते. पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या महिला बेकायदेशीररित्या बांगलादेशातून भारतात येत असल्याची माहिती मिळाली. त्याचबरोबर त्या स्वतः पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे सांगतात. त्यांनतर शहरातील बुधवारपेठेत येऊन स्वखुशीने वेश्याव्यवसाय करत असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिली माहिती
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले म्हणाले, आपण बांग्लादेशी नागरिक शोधण्यासाठी एक पथक बनवलेले आहे. त्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. 2 जुलैला केलेल्या कारवाईत आपण आठ बांग्लादेशी महिला पकडल्या आहेत.त्यानंतर 18 तारखेला एक मोहिम हाती घेतली रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 4 वाजल्यापासून ही मोहीम केली.यावेळी फरासखाना पोलिस स्टेशन हद्दीत 5 महिला आढळून आल्या, आत्तापर्यंत13 महिला आढळल्या आहेत, त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये फक्त महिलाच नाही तर पुरूषही भारतात आले आहेत. त्यांना शोधण्यासाठी ही मोहिम सुरू ठेवली आहे. एफसी रोड, डेक्कन बाकी ठिकाणी मोहिम सुरू ठेवून यांचा तपास केला जात आहे. त्यांना आणणाऱ्यांचा देखील शोध घेतला जात आहे, अशी माहिती देखील रावले यांनी दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.