चुलत भावानेच घेतला जीव, नंतर पोत्यात मृतदेह घालून…; पुण्यातील खळबळजनक घटना


गुन्हे बातम्या ठेवा: पुणे शहरातील कात्रज-गुजरवाडी परिसरात चुलत भावाकडूनच तरुणाची हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अजय पंडित, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक पंडित , असे आरोपीचे नाव आहे. दोघेही झारखंडचे रहिवासी असून काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते. आरोपी अशोक पंडितला पुणे पोलिसांनी (Pune Police) पिंपरी चिंचवड येथून अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (Pune Crime News)

गुजर निंबाळकरवाडी येथे रस्त्याकाठी संशयास्पद पोते आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास सुरू केला असता मयत तरुणाचे नाव अजय पंडित असल्याचे समोर आले होते.

Pune Crime News: आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटक

अशोक पंडित याने भावाची हत्या करत मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे फेकून दिला होता. मृत पावलेला तरुण आणि आरोपी दोघेही चुलत भाऊ असून झारखंड येथील राहणारे आहेत. अंतर्गत वादातून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी अशोक पंडित याला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Pune Crime News: सिंहगड कॉलेज हत्या प्रकरणातील आरोपीची धिंड

दरम्यान, सिंहगड रोड परिसरातील हत्या प्रकरणात अटक केलेल्या मुख्य आरोपीची सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धिंड काढली. काही दिवसांपूर्वी जुन्या वादातून तौफिर शेख या तरुणाची पाच जणांनी हत्या केली होती. मृत तौफिर शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्याकांडातील काही आरोपी अल्पवयीन असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Pune News: पुणे महापालिकेची अतिक्रमणाविरोधी मोहीम

पुणे महापालिकेकडून कात्रज, कोंढवा आणि मुंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली. गंगाधाम–कात्रज रोडवरील स्वामी समर्थ नगर परिसरात, महावीर चौकाजवळील काकडे वस्तीमध्ये अधिकाऱ्यांच्या पथकाने अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया राबवली. कारवाईदरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली असून, पोलीस बंदोबस्तात ही मोहीम सुरळीत पार पडली.

आणखी वाचा

Old Age Home Pune :पुण्यातल्या 16 वृद्धांच्या हेळसांडीची चौकशी होणार; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळांचे आदेश, एबीपी माझाच्या बातमीची सरकारकडून दखल

आणखी वाचा

Comments are closed.