हिंजवडीतील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी; स्वतःची नवीन कंपनी थाटली, 100 हून अधिक
पुणे: हिंजवडी आयटी नगरीतील फ्युचरीइम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांनी गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्युशन ची माहिती चोरून, तब्बल 82 कोटी रुपयांचे कंपनीचे नुकसान केले आहे, ही घटना एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधी मध्ये घडली होती, याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी दत्तात्रय प्रभाकर काळे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांत फिर्याद दिली होती. ही चोरी कंपनीमधीलच माझी तीन कर्मचाऱ्यांनी आणि एका महिलेने मिळून केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
नेमकं काय घडलं?
याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी माजी कर्मचारी विश्वजीत मिश्रा, नयूम शेख ,सागर विष्णू यांना अटक केली आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले तीन लॅपटॉप चार मोबाईल हस्तगत केले आहेत, पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार या माजी कर्मचाऱ्यांनी चोरी केलेला डेटा सोल्युशनचा वापर करून स्वतःची नवीन कंपनी स्थापन केली होती. एवढेच नाही तर या कंपनीच्या नावाखाली त्यांनी 100 हून अधिक बेकायदेशीर वेबसाईट तयार करून त्या ग्राहकांना विकल्या होत्या. या प्रक्रियेत त फिर्यादी यांच्या कंपनीला मिळणारा मोबदला आणि भविष्यातील करारातील अपॉर्च्युनिटी लॉस तसेच इतर तांत्रिक सेवांचा महसूलही मोठ्या प्रमाणावरती कमी झाला होता. या सर्व गोष्टींमध्ये कंपनीचे 82 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
अटकेत असलेल्या आरोपींनी केवळ भारतातच नाही तर अमेरिकेमध्ये सुद्धा असलेल्या ग्राहकांसोबत संगणमत करून गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी डेटाची सुरक्षा आणि करारातील अटी , कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्याबाबत अधिक कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे आणि काही मोजक्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना कंपनीने पाठीशी न घालण्याचे आवाहन पोलिसांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी तब्बल ₹82 कोटींचा तोटा घडवून आणणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे. संबंधित आरोपींनी एका खासगी कंपनीमधील सॉफ्टवेअर सोल्यूशन्स आणि सोर्स कोड्स चोरून स्वतःची नवी कंपनी सुरू केली आणि त्याद्वारे शंभरहून अधिक संकेतस्थळे तयार करून उत्पन्न मिळवले.
सायबर पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी सांगितले की, या तिघा आरोपींबरोबर आणखी दोन साथीदारही या प्रकरणात सामील आहेत. त्यांनी चोरी केलेल्या कोड्स व सॉफ्टवेअरचा गैरवापर करून प्रतिस्पर्धी कंपनी उभी केली. यामुळे तक्रारदार कंपनीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. “बाणेर येथील त्यांच्या नव्या कंपनीचा आम्ही शोध घेतला. पोलिस उपनिरीक्षक सागर पोमन यांनी पथकासह गेल्या आठवड्यात छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले,” असे स्वामी यांनी सांगितले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन लॅपटॉप आणि चार मोबाईल फोन जप्त केले असून, फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आणखी वाचा
Comments are closed.