पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन वाद, राग मनात धरुन चुलत भावानेच आपल्या चुलत भावाला संपवलं
गुन्हे बातम्या ठेवा: लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी राग मनात धरून चुलत भावानेच आपल्या चुलत भावाला संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. धारदार शस्त्राने खून केली आहे. भावाच्या लग्नातील वरातीत नाचण्यावरुन दोन चुलत भावांची भांडण झाली होती. याचा राग मनात धरुन चुलत भावाला संपवलं आहे. तेजस पिलाने असे हत्या करण्यात आलेल्या 24 वर्षे तरुणाचं नाव आहे. नावभारती विद्यापीठ पोलिसांनी पाठलाग करुन चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उपचारादरम्यान तेजसचा मृत्यू झाल्याची माहिती
या प्रकरणी पोलिसांनी विशाल खोपडे (22), अभिषेक खोपडे (23), हरिश्चंद्र धुळे (43), आदिनाथ कसबे (19) अशा चारही आरोपींना अटक केली आहे. 25 एप्रिलला कात्रज सर्व्हिस रोडवर तेजस पिलाने हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याच्यावर धारदार शस्त्रने वार करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी भारतीय विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला उपचारादरम्यान तेजसचा मृत्यू झाला. तेजसच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली आणि याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी थेट वेल्हा जवळील कोंढवाळे गाव गाठलं आणि त्यात तेजसची आणि आरोपी असलेल्या विशाल खोपडे याची दोघांच्याही भावाच्या लग्नात नाचण्यावरून भांडण झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि 22 वर्षाच्या तरुणासह अजून तीन जणांना अटक केली आहे.
लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादाचा राग तेजस पिलानेवर काढला
विशाल खोपडे (22), अभिषेक खोपडे (23), हरिश्चंद्र धुळे (43), आदिनाथ कसबे (19) अशी चारही आरोपींची नावं आहेत. या सगळ्यांनी मिळून लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादाचा राग तेजस पिलानेवर काढला आणि त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.
अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक घटना, उसाच्या शेतात आढळला मृतदेह
अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका उसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिशिंगणापूर जवळील हनुमानवाडी इथं घडली आहे. रंगनाथ पंढरीनाथ शेटे ( वय 75 ) असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
गेल्या पाच दिवसांपासून रंगनाथ शेटे बेपत्ता होते
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून रंगनाथ शेटे बेपत्ता होते. उसाच्या शेतात उग्र वास येवू लागल्याने स्थानिकांनी शोधाशोध केली. यावेळी उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला की अजून काय? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. स्थानिकांनी वनविभाग तसेच पोलिसांना माहिती कळवली आहे. पोलिस आणि वनविभागाकडून अधिकचा तपास प्रारंभ करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
खंडणीसाठी मित्रानेच केलं मित्राचं अपहरण! अथर्व मनोरे हत्या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर, तीन आरोपींना अटक
आणखी वाचा
Comments are closed.