परदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणातील शंतनु कुकडेच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार; द

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे बलात्कार प्रकरणी अपडेट समोर आली आहे. शंतनु कुकडे याच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. कुकडे याच्या बँक खात्यातून पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष दीपक मानकर यांच्या नावावर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा जबाब नोंदवला आहे. नेमके हे पैसे कशासाठी कुकडेने मानकर यांना दिले याची चौकशी सुरू  असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना एका परदेशी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कुकडे याच्यावर याआधी दोन तरुणींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गरजू विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा

पुण्यातील कॅम्प परिसरात आलिशान बंगल्यात गरजू विद्यार्थ्यांची सोय करणाऱ्या शंतनु कूकडेने काही महिन्यांपूर्वी या बंगल्यात दोन मुलींना आणले होते. यापैकी एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आहे .या मुलींनी शंतनु कुकडे विरोधात बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर शंतनू कुकडे याच्यावर लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी तसेच अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष पद शंतनू कुकडेकडे होते. पण त्यानी आधीच या पदाचा राजीनामा दिल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे.

पुण्यात एका बंगल्यात तो डान्सबार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकारही सुरू असल्याची चर्चा होती. मुलींचे धर्म परिवर्तन करण्यासाठी त्याला इंटरनॅशनल फंडिंग येत असल्याचा आरोप त्याच्यावरती झाला आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. याप्रकरणी शंतनू कुकडे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी कुकडेवर गंभीर आरोप करत त्याच्या बॅंक खात्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती.

तो क्लब चालवत होता, लहान मुलींच्या अनैतिक संबंध ठेवल्याच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी अनेक राजकीय लोक पोलिस अधिकारी शासकीय लोकांचा वावर होता. महिला आयोग यांना पत्र दिलं, त्यांनी याबाबत चौकशी करायला सांगितले. तो धर्मांतर करायला लावतो,अनेक लोक त्याच्यासोबत काम करत आहेत. करोडो रुपये त्याने जमवले आहेत. तो अनेक धंदे करतो, याचा तपास पोलिसांनी का केला नाही, यात राजकीय लोक सोबत असतात, या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा असंही पुढे धंगेकरांनी म्हटलं होतं.

अधिक पाहा..

Comments are closed.