गज्या मारणेसह पोलिसांचा डर्टी पिक्चर, सांगलीच्या वाटेत मटण पार्टी; निलंबनाच्या कारवाईसह गुन्हेह

पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे आणि पोलिसांच्या मटन पार्टीची चर्चा चांगलीच रंगली आहे. पुण्यात मुख्य कारवाई झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने गजा मारणे यांना सांगली कारागृहात नेताना पुणे पोलिसांनी कणसे धाब्यावर मटन पार्टी केली होती. गपचूप केलेल्या मटन पार्टीची माहिती पुणे पोलीस आयुक्तांना मिळाली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट चार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं निलंबन केले. या ढाब्यावर नेमकं काय घडलं पाहुयात…

नेमकं काय घडलं?

गजा मारणे…. पुण्यातला कुख्यात गुंड… कधी जेलमधून सुटल्यानंतरची रॅली चर्चेत असते…. तर कधी पुणे पोलिसांसमोर गुडघ्यावर बसलेला फोटो चर्चेत येतो…. एवढेच नाही तर काढलेली धिंडदेखील चर्चेत असते… पुण्यातला कायम चर्चेत असलेला गजा मारणे आज पुन्हा एकदा चर्चेत आला … असा तसा नाही तर थेट पुणे पोलिसांसोबत केलेल्या पार्टीमुळे… मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्यानंतर गजा मारणे याच्यावर पुणे पोलिसांनी मोकाच्या अंतर्गत कारवाई केली खरी आणि त्यानंतर त्याला पुन्हा येरवड्यातली जेलवारी झाली. मात्र, संरक्षणाखातर गजा मारणेची रवानगी सांगलीतील कारागृहात करण्यात आली. बारा मार्चला त्याला सांगली कारागृहात नेण्याचा निर्णय झाला आणि पुणे पोलिसांचं पथक त्याला सांगलीत घेऊन जाण्यासाठी निघालं. मात्र सांगलीला जात असतानाच सातारा जवळील कणसे धाब्यावर पोलिसांची व्हॅन थांबली. व्हेन थांबल्यावर पोलीस आणि गजा मारणे यांनी मटणाची पार्टी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्यानंतर याचा सगळा कानोसा पोलीस आयुक्तांना लागला आणि त्यांनी थेट चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी थेट या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावं

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू
पोलीस हवालदार महेश बामगुडे
सचिन मेमाने
पोलीस शिपाई राहुल परदेशी

ही पार्टी इथेच थांबली नाही तर या पार्टी दरम्यान गजा मारणेला दोन फॉर्च्युनर अन् एका थार भेटायला आली आणि यातून गजा मारणेचे सहकारी खाली उतरले… त्यांनी देखील पार्टी केली… यात सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते हे तिघं होते. मोक्का कारवाईनंतर गजा मारणेला भेटायला आलेले आणि पोलिसांनी बिनधास्त सगळ्यांना भेटू दिलं. यातील विशाल धुमाळवर खूनाचा गुन्हा दाखल आहे, तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारणेच्या टोळीचा शूटर आहे. आता या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोण आहे गजा मारणे?

– गजा मारणे पुण्यातील कुख्यात गुंड आहे.
– अमोल बधे आणि पप्पू गावडे यांचा खून झाला होता, या प्रकरणात गजा मारणेला अटक झाली होती. त्यामुळे तो 3 वर्षे येरवडा कारागृहात होता.
– मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून गजा मारणेची ओळख बनली आहे.
– गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
– मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
– जामीनानंतर काढलेली रॅली चर्चेत राहिली.
– आतापर्यंत 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे.
– आता सांगली कारागृहात आहे.

गजानन मारणे याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं वरिष्ठ सांगतात. रिल्स, सोशल मीडियामुळे त्याचा परिणाम तरुणांवर होत असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. जामीनावर सुटल्यावर येरवड्यात शेकडो तरुण एकत्र येत रॅली काढली होती. गुन्हेगारी का वाढते. ती म्हणजे या गुंडांचं विविध माध्यामातून तरुणांमध्ये आकर्षण निर्माण होतं. मात्र कडक कारवाई करण्याऐवजी पोलिसच त्याला मटण खाऊ घालत असतील तर गुन्हे गारी संपणार कशी?

गजा मारणेची पुणे पोलिसांनी धींड काढली, गुडघ्यावर बसवलं… उद्देश होता की अशा गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी. मात्र याच गजानन मारणेसोबत पुणे पोलिसांनी पार्टी केली. गजानन मारणे सारख्यांची दहशत का संपत नाही आणि समाजातील गुन्हेगारीला ते का हातभार लावतात. याचं उत्तर निलंबित झालेल्या या पाच पोलिसांनी दिलंय.

https://www.youtube.com/watch?v=vggehpyqetk

अधिक पाहा..

Comments are closed.