पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलव

पुणे (कोथरूड): पुण्यातील कोथरूड भागात एका २३ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या (Pune Crime News)करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नागेश संजय जाधव (वय २३, रा. शिवाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी मुलीच्या (Pune Crime News) नातेवाईकांसह अनेक जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)

Pune Crime News:  एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर

नागेश जाधव याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी रात्री घडली. नागेशचे कोथरूड परिसरातील एका मुलीशी मैत्रीचे नाते होते. शनिवारी सायंकाळी ७:१५ च्या सुमारास नागेशला एकाचा फोन आला आणि तो घराबाहेर पडला. रात्री ८:०३ वाजता आरोपींनी नागेशच्या आईला त्याच्याच मोबाईलवरून फोन केला. फोनवर आरोपीने शिवीगाळ करत म्हटले की, “तुझा मुलगा नागेश आमच्या ताब्यात आहे, आम्ही त्याला मारले आहे. १० मिनिटांत येथे येऊन त्याला घेऊन जा, नाहीतर त्याला खाली टाकून देऊ.”(Pune Crime News)

Pune Crime News: मारहाण आणि निर्घृण हत्या

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, नागेशची आई आणि नातेवाईकांनी तात्काळ कोथरूडमधील मेगासिटी (एसएनडीटी जवळ) येथे धाव घेतली. तिथे नागेश छतावर विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. काही महिला आणि पुरुष त्याला लाकडी दांडके, लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Pune Crime News)करत होते. नातेवाईकांनी त्याला तातडीने आधी रत्ना हॉस्पिटल आणि नंतर ससून हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी नागेशने आपल्या आईला सांगितले की, त्याला मुलीने फोन करून बोलावले होते आणि तिथे गेल्यावर तिच्या कुटुंबीयांनी त्याला बेदम मारहाण केली.(Pune Crime News)

Pune Crime News:  १० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी मुलीची आई, वडील, तसेच चुलत्या, आणि इतर नातेवाईक यांच्यासह १० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी संगनमत करून नागेशची हत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष (Pune Crime News) पोलिसांनी काढला आहे. एका तरुणाची अशा प्रकारे नियोजनबद्ध रितीने हत्या केल्यामुळे कोथरूड आणि शिवाजीनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे. आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. (Pune Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.