पुण्यातील वाघोलीत भयंकर घटना, आईने 11 वर्षांच्या मुलाला संपवलं, मुलीवरतीही हल्ला, पांढऱ्या फरश

पुणे: पुण्यातील वाघोली परिसरातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईच्याच हातून 11 वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून (Pune Crime News) झाल्याची घटना उघडकीस आली आहे, याच घटनेत 13 वर्षांच्या (Pune Crime News) मुलीवरतीही आईने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. तर सुदैवाने ही मुलगी थोडक्यात बचावली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Pune Crime News)

ही भीषण घटना पुण्यातील वाघोली परिसरातील बाईफ रोड भागात घडली आहे. सोनी संतोष जायभाय, मूळ रहिवासी कंधार, जिल्हा नांदेडसध्या वाघोली येथे वास्तव्यास असलेल्या महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत 11 वर्षांचा साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 13 वर्षांची धनश्री संतोष जायभाय गंभीर जखमी झाली आहे.(Pune Crime News)

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी गंभीर घटना असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून, तिने हे टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरू आहे. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव की यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.(Pune Crime News)

वाघोलीत सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत. या घटनेनंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये घरात असलेल्या पांढऱ्या फरशीवरती सर्वत्र रक्ताचे लाल डाग पडल्याचं चित्र दिसून येत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.