लहानग्या मुलासमोर बायकोला संपवलं, बॉडी घेऊन बाईकवरच निघाला, मध्यरात्री चौकात पोहचला, पोलिसांना
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने आठ वर्षाच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीला निर्घृणपणे संपवून त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना त्याला पोलिसांनी पकडलं. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तर दिली मात्र, चिमुकल्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलेली हकीकत सांगितली. ही मन हेलावून टाकणारी घटना पुण्यातील नांदेड सिटी जवळ ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वयंपाक करण्यावरून आणि घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने आपल्या आठ वर्षाच्या मुलासमोरच पत्नीचा गळा दाबून तीचा खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह कापडात गुंडाळला आणि विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून घेऊन निघाला. मात्र, पत्नीच्या मृतदेहाचा विल्हेवाट लावताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं आणि त्यानंतर चौकशी केली. पोलिसांना त्याने उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र, आठ वर्षाच्या मुलाजवळ चौकशी केली असता पतीचं सगळं पितळ उघड पडलं. पुण्यातील नांदेड सिटी जवळ ही घटना घडली आहे. राकेश राम नाईक निसार असं आरोपीचे नाव आहे, तर बबीता निसार असं पत्नीचे नाव आहे.
आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी राकेश निसार याला पकडलं आणि सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. राकेश धायरी परिसरात आपल्या कुटूंबासह वास्तव्यास आहे आणि तो मजुरी काम करतो. रात्री एक वाजताच्या सुमारास स्वामीनारायण मंदिर समोरून भुमकर पूलाजवळ नागरिकांना एक व्यक्ती संशयितरित्या गाडीवरून काहीतरी घेऊन जात असल्याचं पाहिलं आणि त्यानंतर त्या स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी भुमकर पुलाजवळ बीट मार्शल पोहोचले आणि त्याला पकडलं असता त्याने गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीट मार्शलने या राकेशला पकडलं आणि त्यावेळी राकेश कडे चौकशी करायला सुरुवात केली.
मृतदेह कोणाचा आहे? कुठून आला आहे ? तू कुठे घेऊन चाललाय? या सगळ्याची चौकशी करत असताना राकेशने उडवाउडवीची उत्तर दिली. मित्रांने हा मृतदेह मागवला आहे, त्याला खेडशिवापूर जवळ नेऊन देतो असं त्याने सांगितलं. मृत पत्नीने फाशी घेतली असल्याचंही त्याने आधी पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांना पुन्हा संशय बळावला आणि त्याच्याकडे पुन्हा विचारणा सुरू केली. नंतर पोलिसांनी थेट राकेशला घेऊन त्याचं धायरीतलं घर गाठलं, तेव्हा राकेश आणि बबिता यांचा आठ वर्षाचा मुलगा घरी झोपलेला दिसला. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता मुलांनी थेट पोलिसांना वडिलांनीच आईला मारून टाकल्याचं सांगितलं. आई आणि वडिलांमध्ये जेवणाच्या कारणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून कायम वाद व्हायचे, आज वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर बाबांनीच आईला गळा दाबून मारून टाकलं असं सांगितलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.