पिस्तूलचा धाक दाखवत 32 वर्षीय महिलेवर अत्याचार, धक्कादायक घटनेनं दौंड हादरलं, आरोपीला अटक

गुन्हे बातम्या ठेवा: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. कुरकुंभ परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला आहे. यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यामध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 25 मार्च 2026 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुकादमवाडी कुरकुंभ हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. पिस्तूलचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आरोपीने संबंधित महिलेला लिफ्ट देण्याचा बहाना करुन पिस्तुलचा धाक दाखवला

आरोपीने संबंधित महिलेला लिफ्ट देण्याचा बहाना केला आणि त्यानंतर तिला पिस्तुलचा धाक दाखवत तिच्यावरती अत्याचार केल्याची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दौंड पोलिसांनी खडकी येथील संशयित आरोपी अमोल साहेबराव काळे याला बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.