पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याकडून 14 कोटी लुबाडणारी मांत्रिक वेदिका पंढरपूरकर फरार


पुणे बेडडुबा: महिला मांत्रिक वेदिका पंढरपुरकर आणि तिचा नवरा कुणाल पंढरपुरकर यांनी पुण्यातील डोळस कुटुंबाची 14 कोटींना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्यानंतरा कालपर्यंत कोथरुडच्या (Kothrude News) महात्मा सोसायटीतील बंगल्यात असणारी वेदिका आणि तिचा पती कुणाल त्यांच्या बंगल्यातुन गायब झाले आहेत. वेदिकाने दिपक डोळस यांच्याकडून उकळलेल्या पैशांमधुन पुण्याच्या कोथरुड भागातील महात्मा सोसायटीत कैलासदीप नावाचा अलिशान बंगला खरेदी केला होता. काल ‘एबीपी माझा’ने या बंगल्यात जाऊन वेदिका यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी वेदिका पंढरपूर (Vedika Pandharpur) आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज वेदिका आणि त्यांचे पती घरातून गायब झाले आहेत. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे‌. (Pune crime news)

‘एबीपी माझा’ने आज महात्मा सोसायटीमधील या बंगल्याची पाहणी केली तेव्हा त्या बंगल्यामध्ये वेदिका पंढरपूर आणि तिचा नवरा यापैकी कोणीही नव्हते. कालपर्यंत या बंगल्यावर अनेक कर्मचारीही होते. मात्र, आज सकाळपासून त्यांचा कोणताही पत्ता नाही. वेदिका पंढरपूर यांच्या बंगल्याबाहेर त्यांची चारचाकी आणि दोन बाईक उभ्या आहेत. मात्र, बंगल्याचा दरवाजा बंद असून आतमधील लाईटही बंद आहेत. त्यामुळे आता पुणे पोलीस काय करणार, हे पाहावे लागेल. पुण्यातील एका उच्चशिक्षित जोडप्याकडून वेदिका पंढरपूर यांनी उपचाराच्या नावाखाली 14 कोटी रुपये उकळले. यासाठी या जोडप्याने इंग्लंडमध्ये असलेले आपले घर आणि फार्महाऊसही विकले होते. आता या दाम्पत्याकडे आपल्या मुलींवर उपचार करण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. काल हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही पुणे पोलिसांनी वेदिका पंढरपूर आणि त्यांच्या नवऱ्याला तात्काळ कारवाई करत ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे त्यांना पळून जाण्यास वेळ मिळाला. यावरुन पुणे पोलीस पुन्हा एकदा टीकेचे धनी होऊ शकतात. त्यामुळे आता याप्रकरणात पुणे पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Pune News: शंकर महाराजांच्या नावाने महिला मांत्रिकाने पुण्यातील इंजिनियरला 14 कोटींना लुबाडलं

दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नीची कोथरुडमधील मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि तिचा नवरा कुणाल यांनी फसवणूक केली. दीपक काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांच्या दोन मुली या नेहमी आजारी असायच्या. त्यामुळे दीपक डोळस चिंतेत असायचे. दरम्यानच्या काळात त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर हिच्याशी झाली. या दोघांनी ‘शंकर महाराज’ त्यांच्या अंगात येतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात असा दावा केला. विश्वास बसावा म्हणून वेदिका पंढरपुरकरने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ आले आहेत असा खोटा आव आणला. त्यानंतर त्यांनी डोळस कुटुंबाला सांगितले की, तुमचे धन आम्ही जपून ठेवल्यास आणि पूजा केल्यास तुमच्या दोन्ही मुली बऱ्या होतील. याच बहाण्याने या भोंदू जोडीने डोळस दाम्पत्याकडून बँकेतील सर्व ठेवी आणि बचत निधी त्यांच्या खात्यात ऑनलाइन वळवून घेतला. या भोंदू जोडीचा कारनामा एवढ्यावरच थांबला नाही तरी त्यांनी डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसेही वेदिका पंढरपुरकरच्या खात्यात वळवून घेतले.

आणखी वाचा

…म्हणून तुमच्या मुली बऱ्या होत नाहीयेत, IT इंजिनिअर अन् शिक्षक पत्नीला भोंदूबाबनं कसं लुटलं, त्याच पैशांनी कोथरूडमध्ये विकत घेतला अलिशान बंगला

मृत्यू टाळण्यासाठी गर्लफ्रेंड अथवा वेश्येसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला, मोबाइल एखाद्या विशिष्ट कोनात ठेवायला लावायचा अन्..; मुळशीच्या भोंदूबाबाचे कारनामे उघड

आणखी वाचा

Comments are closed.