Ketan Agarwal Death Case : “तुला जमणार नाही, मीच ढकलतो…”; पहिल्या दोन प्रयत्नांवेळी हताश होऊन चेतन रडू लागला होता, आरोपी सिया गोयलचा नवा दावा!
पुणे: पुण्यातील चर्चित केतन अगरवाल प्रकरणात (Ketan Agarwal Death Case) आता नवरी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात पोलीस कोठडीत जोरदार ‘ब्लेम गेम’ (एकमेकांवर दोषारोप) सुरू झाला आहे. पोलिसांनी जेव्हा दोघांची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांच्यातील एकजूट पूर्णपणे तुटली. “तुला हे जमेल असं वाटत नाही, आता मीच त्याचे काम तमाम करतो,” असे म्हणत अखेरीस चेतननेच (Ketan Agarwal Death Case) केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलल्याचा नवा दावा सियाने केला आहे. तर दुसरीकडे, चेतनने या संपूर्ण कटाची मुख्य सूत्रधार सियाच असल्याचा आरोप केला आहे.(Ketan Agarwal Death Case)
Pune Ketan Agarwal Death Case : प्रियकर चेतनचा पोलिसांसमोर खुलासा
पोलिसांच्या चौकशीत चेतन चौधरीने एक वेगळीच बाजू मांडली आहे. चेतनच्या म्हणण्यानुसार, त्याला सियासोबत पळून जाऊन कुठेतरी दूर नव्याने आयुष्य सुरू करायचे होते. मात्र, सियाचाच असा आग्रह होता की पळून जाण्याने काही होणार नाही, कारण तिचे कुटुंब प्रचंड श्रीमंत आहे आणि ते त्यांना जगाच्या पाठीवर कुठूनही शोधून काढतील. या लग्नातून सुटकेचा आणि केतनपासून सुटका मिळवण्याचा ‘खून’ हाच एकमेव उपाय असल्याचे सियानेच निश्चित केले होते, असा दावा चेतनने केला आहे.(Ketan Agarwal Death Case)
Pune Ketan Agarwal Death Case : “चेतन रडला अन् स्वतःकडे जबाबदारी घेतली”; सियाने आळ उलटवला
चेतनच्या या दाव्याच्या पूर्णपणे उलट कहाणी सियाने पोलिसांना सांगितली आहे. सियाचा आरोप आहे की, केतनच्या खुनाचा कट सुरुवातीपासूनच चेतनने रचला होता. लोहगडावर झालेल्या पहिल्या दोन ट्रेकमध्ये सियाला केतनला दरीत ढकलण्याचे धाडस झाले नाही. १४ जून रोजी झालेला प्रयत्न जेव्हा अयशस्वी ठरला, तेव्हा चेतन हताश झाला आणि रडू लागला. त्यानंतर त्याचा संयम सुटला आणि त्याने सियाला स्पष्ट बजावले की, “तुला हे जमणार नाही, आता ही जबाबदारी मी घेतो आणि हे काम पूर्ण करतो.”
Pune Ketan Agarwal Death Case : महाबळेश्वरमध्ये घालवायचा होता एकांतात वेळ!
तर एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चेतनने तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्यामागे एक खास हेतू होता. त्याला सियाला केतनच्या बंधनातून लवकरात लवकर मुक्त करायचे होते, जेणेकरून केतनचा काटा निघाल्यानंतर त्या दोघांना महाबळेश्वरमध्ये एकत्र जाऊन एकांतात वेळ घालवता येईल. धक्कादायक बाब म्हणजे, केतनची हत्या केल्यानंतरही हे दोघे सतत एकमेकांच्या संपर्कात होते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, पोलीस कोठडीत असलेल्या या दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याबद्दल कसलाही पश्चात्ताप दिसून आलेला नाही.
Pune Ketan Agarwal Death Case : ‘मी वाकले की तू ढकल’; ठरला होता ‘खूनी संकेत’
चौकशीदरम्यान सियाने अखेर कबूल केले की, हत्येच्या अचूक वेळेसाठी त्यांनी आधीच एक ‘सिग्नल’ (संकेत) ठरवला होता. लोहगड किल्ल्याच्या कडेला पोहोचल्यावर सिया जेव्हा केतनसमोर खाली वाकली, तोच चेतनसाठी खूण होती. तो संकेत मिळताच मागून आलेल्या चेतनने केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले. या ‘खूनी सिग्नल’बाबत गुन्ह्याच्या बऱ्याच आधी चर्चा झाली होती आणि तो निश्चित करण्यात आला होता.
Pune Ketan Agarwal Death Case : २३८ तासांचे कॉल्स; फोनवरच लिहिला गेला मृत्यूचा खेळ!
पोलिसांनी गोळा केलेल्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सवरून (CDR) अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. केतनच्या मृत्यूच्या आधीच्या ६ महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००० पेक्षा जास्त वेळा फोनवर बोलणे झाले होते. या संवादाचा एकूण कालावधी सुमारे २३८ तास (म्हणजेच सलग १० पूर्ण दिवस) इतका मोठा आहे. तपास अधिकाऱ्यांचा संशय आहे की, यातील बहुतांश वेळ हा हत्येचा कट रचण्यात आणि त्याचे नियोजन करण्यात खर्ची पडला होता. मात्र, आता हाच भक्कम तांत्रिक पुरावा समोर आल्यावर दोन्ही आरोपी बचावासाठी या कटाची संपूर्ण जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.