निलेश घायवळच्या पासपोर्टवरील आहिल्यानगरच्या खोट्या पत्त्यावर पोहोचली कोथरूड पोलिसांची टीम; परिस


अहिलीनगर: काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरात मध्यरात्री झालेल्या फायरिंगमुळे (Pune Crime News) नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. चौकशीत हे उघड झालं की हा गोळीबार कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतील सदस्यांनी केला होता. या घटनेनंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे स्वतः निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) हा देशात नसून तो लंडनला पलायन केल्याचे  (Pune Crime News) उघड झाले. यामुळे खळबळ उडाली असली तरी पोलिस त्याच्या मागावर आहेत.दरम्यान त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना देखील तो भारताबाहेर कसा गेला, त्याने चुकीचा पत्ता, नावात बदल करून तो पासपोर्ट कसा मिळवला याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे, दरम्यान त्याने आहिल्यानगरमधील दिलेल्या पत्त्यावरती पोलिस दाखल झाले,त्यांनी त्या परिसराची पाहणी देखील केल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यात कोथरूड पोलिसांची एक टीम अहिल्यानगर शहरात दाखल झाली आहे. या टीमने पासपोर्टवर असलेल्या पत्त्यावर जाऊन स्वतः पाहणी केली. त्यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना संबंधित पासपोर्टवर उल्लेख असलेली सर्व ठिकाणं दाखवली. निलेश घायवळ याचा पासपोर्ट संदर्भात प्रकरण ज्यावेळी कोतवाली पोलिसांकडे आले त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ हे तिथे कार्यरत होते. पुणे पोलीसांचं पथक आज निलेश घायवळला पासपोर्ट नक्की कसा मिळाला याचा तपास करण्यासाठी नगरमध्ये पोहचल आहे. पासपोर्ट मिळवण्यासाठी नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जो पत्ता देण्यात आला होता त्या पत्त्यावर जाऊन पुणे पोलिसांच्या पथकाने तपास केला. त्यानंतर हे पथक नगरच्या पोलीस मुख्यालयात जाऊन निलेश घायवळने पासपोर्टसाठी नक्की कोणती कागदपत्रे जमा केली होती, याचाही तपास करणार आहे. या पासपोर्टसाठी निलेश घायवळने पत्ता पुण्यातील दिलाय, मात्र त्यासोबत जोडलेले आधारकार्ड पुण्यातील कोथरुडच्या पत्त्यावरचे आहे.

घायवळने दिलेल्या पत्त्यावरती कोणतही घर किंवा काहीच अस्तित्वात  नव्हतं. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर कोथरूड पोलिसांचा पथक पोहोचलं, तो पत्ता पाहून पोलिसांनी घटनास्थळाची पडताळणी केली. त्याने दिलेला हा पत्ता कुठे अस्तित्वातच नव्हता. त्यामुळे त्यांना तिथे कोणतंही घर किंवा अन्य काही सापडला नाही. त्याचबरोबर पोलीस दुसरा एक तपास करत आहेत तो म्हणजे नगर मधील पासपोर्ट देणारा जो विभाग आहे ज्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी केली जाते त्या विभागांमध्ये देखील पुणे पोलिसांचा पथक जाणार आहे त्या ठिकाणी देखील सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी चुकीचा पत्ता आणि नावात बदल करून दिला होता, त्यासाठी त्यांनी काही कागदपत्र जोडली होती. त्यासोबत त्याचा आधार कार्ड होतं त्या आधार कार्डवरचा पत्ता मात्र पुण्यातील आहे. अशातच दोन वेगवेगळे पत्ते असताना पासपोर्ट कसा मिळाला आणि हा पासपोर्ट नेमका गेला कोणाकडे याचा पोलीस तपास करत आहेत.

Nilesh Ghaywal: गुंड निलेश घायवळचे कॅरेक्टर मात्र खटकले नाही

सामान्यांना पासपोर्ट देताना कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करणाऱ्या पासपोर्ट कार्यालयाला आणि नगर पोलिसांना गुंड निलेश घायवळचे कॅरेक्टर मात्र खटकले नाही. घायवळवर हत्य, अपहरण, खंडणी, शस्त्रांचा वापर असे अनेक गंभीर गुन्हे नोंद असताना देखील पासपोर्ट मिळवण्यात घायवळ यशस्वी ठरला. पासपोर्टसाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यलयाकडे घायवळने २३ डिसेंबर २०१९ला अर्ज केला. मात्र आर्जवर पुण्यातील नाही तर अहिल्यानगरचा गौरी घुमटानंदी बाजार , कोतवाली , माळीवाडा रोड ४१४००१ हा पत्ता त्याने दिला  होता, आज त्या पत्यावरती कोथरूड पोलिसांची एक टीम दाखल झाली त्यांनी परिसराची पाहणी केली.

Nilesh Ghaywal: नॉट अव्हेलेबल एवढाच अभिप्राय पासपोर्ट कार्यलयाला कळवला

नगरच्या कोतवाली पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या पत्त्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली असता त्यांना घायवळ आढळून आला नाही . त्याचबरोबर त्याच्याशी संपर्क देखील होऊ शकला नाही. कारण मुळात असा कोणता पत्त्ता अस्तित्वातच नाही. मात्र कोतवाली पोलिसांनी हा पत्ताच बनावट आहे असं पासपोर्ट कार्यलयाला न कळवता नरो वा कुंजरोवा भूमिका घेत नॉट अव्हेलेबल एवढाच अभिप्राय पासपोर्ट कार्यलयाला कळवला. त्याआधारे १६ जानेवारी २०२०ला घायवळला पासपोर्ट कार्यालयाकडून तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट  देण्यात आला.

Nilesh Ghaywal: नावातील h काढून टाकला आणि Gaywal असं केलं

हा पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने नाव देखील बनावट वापरलं. त्यासाठी आडनावाच्या स्पेलिंग मध्ये बदल केला. Ghaywal या नावातील h काढून टाकला आणि Gaywal असं केलं. आश्चर्य म्हणजे पुढील पाच वर्षे याचा पोलिसांना आणि पासपोर्ट कार्यालयाला थांगपत्ता देखील लागला नाही .

Nilesh Ghaywal: त्याचा पासपोर्ट जमा केला नाही

२०२१ मधे निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि मकोका कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढच्यावर्षी म्हणजे २०२२ मधे घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मीळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळ ने त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलीसांनी देखील जमा करुन घेतला नाही. हाच पासपोर्ट वापरुन सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ तीन महिन्यांचा व्हीजा मिळवून युरोपला फीरायला गेला‌.

आणखी वाचा

Comments are closed.