सासू भाजप पक्षाकडून सरपंच; सासरे शिक्षक, तरी पैशांसाठी सुनेला छळलं, शेवटी कंटाळून तिनं आपल्या त

पुणे: पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. पुण्यातील उरुळीकांचन (Pune Crime News) जवळील सोरतापवाडीमधील ही घटना आहे.  आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू ही भाजप पक्षातून सरपंच आहे तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. उरुळीकांचन पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला (Pune Crime News) आहे. दीप्ती मगर चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. घरातच आपल्या तीन वर्षाच्या मुलीसमोर या विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.(Pune Crime News)

या विवाहितेच्या आत्महत्येनंतर पती,दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहन चौधरी असे पतीचे नाव आहे, तर सुनीता चौधरी सासूचे नाव, कारभारी चौधरी सासरे तर रोहित चौधरी दिराचे नाव आहे. सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. २०१९ ला दिप्ती आणि रोहन यांचा विवाह झाला होता. लग्नामध्ये ५० तोळे सोने देण्यात आले होते. नंतर विवाहितेवर वेगवेगळे आरोप करण्यात आले, एक महिन्यानंतर तिला सासरकडून मानसिक व शारिरीक छळ सुरू झाला, तिच्या चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली काम येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करत तिचा छळ करण्यात आला. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा १० लाख रुपये कॅश दिली, गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये देण्यात आले होते. मात्र तरीही त्रास संपला नाही अखेर दीप्तीने गळफास लावून आत्महत्या केली.(Pune Crime News)

आरोपी सासू सुनिता चौधरी भाजप पक्षाकडून सरपंच

आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर २०२५ मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या भाजप पक्षाकडून झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

मोठेपणा दाखविण्यासाठी पैशांची मागणी दिप्तीच्या आईने सांगितली आपबिती

मृत दिप्तीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, ऑक्टोबर 2025 मध्ये दिप्ती हिची सासु सुनिता कारभारी चौधरी ही सोरतापवाडी ग्रामपंचायत सरपंच झाली, त्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठेपणा दाखविण्यासाठी दिप्तीकडे तिचे पती रोहन याने पैशांची मागणी केली, दिप्ती हिने मी आता माहेरून पैसे आणणार नाही असे सांगितल्याने तिचे पती रोहन, सासरे कारभारी व सासु सुनिता, दीर रोहित यांनी तीला शाररिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली व तिचे पती रोहन यांने तुझे माहेरकडील लोक फक्त दिखाव्याने मोठे आहे, पण मनाने तुझासाठी भिकारी आहेत. असे तिला टोचुन बोलून तिचे मानसिक खच्चीकरण केले, तसेच तिची सासु हि नेहमीचं तिला आमचे माहेरील लोकांबाबत खालच्या स्थरावर जावुन शिवीगाळ करीत असल्याबाबत तिने मला वेळोवेळी सांगितले होते, असंही दिप्तीच्या आईने तक्रारीत म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.