आईच्या मित्रानं शाळेत सोडतो म्हणून नेलं; डीपी रोडवर कार थांबवली अन्…, 13 वर्षीय चिमुरडीवर के
पुणे: पुण्यात आईच्या मित्राकडून तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक (Pune Crime News) माहिती समोर आली आहे. शाळेत सोडतो असं सांगून कारमध्येच नराधमाने त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पुण्यातील प्रसिद्ध डीपी रोड परिसरात ही घटना घडली आहे. लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याचे कोणाला सांगितलं तर बघून घेतो अशी धमकी त्याने तेरा वर्षे मुलीला दिली. ज्ञानेश्वर रायरीकर असं लैंगिक अत्याचार करणाऱ्या 29 वर्षीय आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)
भर रस्त्यात गाडी लावून लैंगिक अत्याचार
पुण्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. मी तुला शाळेत सोडतो असं सांगून एका 32 वर्ष विधवा आईच्या 29 वर्षीय मित्राने तिच्या 13 वर्षीय मुलीवर भर रस्त्यात गाडी लावून लैंगिक अत्याचार केलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये आईने तक्रार दाखल केली असून वारजे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. ज्ञानेश्वर रायरीकर असं 29 वर्षे आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)
शाळेत सोडतो म्हणून सांगून तिला डीपी रोडवर घेऊन गेला
पीडित मुलीची आई विधवा आहे ती आणि ज्ञानेश्वर मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत, त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख होती. आईचा ज्ञानेश्वर वर विश्वास होता आणि त्यामुळे मुलीला त्याच्यासोबत फिरण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे मुलीने शाळेत सोडण्यासाठी ज्ञानेश्वर याला बोलवलं आणि त्याने देखील मी शाळेत सोडतो म्हणून सांगून तिला डीपी रोडवर घेऊन गेला मात्र शाळेत न सोडताच गाडी डीपी रस्त्यावर थांबवली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. (Pune Crime News)
आईने अर्धा तास का उशीर झाला याची माहिती मुलीला विचारली
मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत सात वाजताच्या ऐवजी साडेसात वाजता पोहोचली होती. त्यानंतर मुलगी घरी आल्यावर आईने अर्धा तास का उशीर झाला याची माहिती मुलीला विचारली आणि त्या मुलीने घाबरत उत्तर दिली. यावरून तिच्या आईच्या संशय वाढला आणि आईने थेट पोलिसात तक्रार दाखल केली . आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल करणे केलाय आणि ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक देखील केली आहे.
या प्रकरणात आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून आरोपीविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच संबंधित वाहनाची तपासणी करून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास वारजे पोलिसांकडून सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.