अजित पवारांच्या जवळच्या पुण्यातील आमदाराच्या हत्येच्या कटाचा तपास आता SIT मार्फत होणार; आरोपींव


पुणे : मावळचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (sunil shelke) यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा अतिरिक्त तपास करण्यासाठी आता एसआयटीची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे, 26 जुलै 2023 रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई करण्यात आली होती या कारवाईच्या दरम्यान सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले होती त्यांच्याकडून तब्बल 9 पिस्तूल 42 काडतुसे, धारदार कोयते जप्त करण्यात आले होते. यातील आरोपी हे पुणे जालना आणि मध्य प्रदेश येथील गुन्हेगार होते. तपासा दरम्यान ते आमदार सुनील शेळके  (sunil shelke) यांच्या हत्येचा कट रचत असल्याचे स्पष्ट झाले होते, याबाबत अधिवेशनात सुनील शेळके यांनी लक्षवेधी ही मांडली होती, यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष तपास पथक द्वारे चौकशी करू असे म्हटले होते, त्यानंतर आता ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.(Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास अतिरिक्त करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २६ जुलै २०२३ रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई केली होती. यामध्ये तपासाअंती सात सराईत गुन्हेगारांना अटक केली.

ज्यांच्याकडून नऊ पिस्तूल, ४२ काडतुसे, कोयते जप्त करण्यात आले. आरोपी पुणेजालना, मध्य प्रदेश येथील गुन्हेगार आहेत. या या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित करत चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या बाबीची विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर तपास पथकाची स्थापन करण्यात आली आहे. आरोपींवर खून, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी माहिती देताना सांगितलं की, तळेगाव दाभाडेत यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिरिक्त तपास, तसेच अन्य कुणाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचा सखोल तपास केला जाईल.

आणखी वाचा

Comments are closed.