चाकणमध्ये महिलेने शतपावली करणाऱ्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा केला पण… रस्त्यावरून फरफटत नेलं अ
पुणे: राज्यभरात पुन्हा एकदा अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी शहरात कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार (Pune Crime News) करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी(ता,13) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चाकण जवळील मेदनकरवाडी येथे घडली आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
पीडित महिला रात्रपाळीसाठी कंपनीत जात होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करत खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढत निर्जनस्थळी नेलं. त्यावेली 27 वर्षांच्या महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला (Pune Crime News) . तिने बचावासाठी आरोपीला चावाही घेतला. मात्र, तिच्यावरती बलात्कार करून मारहाण करत कोणाला याबाबत वाच्यता न करण्याची धमकी देत तो पसार झाला. त्याचवेळी एक कामगार महिला आणि पुरुष तेथून जात असताना त्यांच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पीडित महिलेने पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Pune Crime News)
आरडाओरडा व्यर्थ ठरला
पीडितेवर अत्याचार होत असतानाच तिच्यापासून काही अंतरावर एक व्यक्ती शतपावली करत होता. पीडितेने त्याला पाहिल्यानंतर मदतीसाठी मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, पीडितेचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे पीडितेला कोणाची मदत मिळाली नाही. त्यामुळे पीडितेला कोणाची मदत मिळू शकली नाही.
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकांची मदत घेतली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पुढील तपास करत आहेत. ‘आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, चौकशी सुरू आहे,’ असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेण्यासाठी सहा विशेष पथके स्थापन केली होती. त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. आरोपीच नाव प्रकाश तुकाराम भांगरे (मेदनकरवाडी, मूळ गाव अहिल्यानगर) असं आहे. पोलिसांनी भांगरे याला ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
24 तासाच्या आत आरोपी अटक
या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.