आधी मटण पार्टी, नंतर पोलिसांचं निलंबन; गजा मारणे प्रकरणात पोलिस आयुक्तांचा आणखी एक दणका, 10 ते
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला पोलिसांच्या संरक्षणात सांगली कारागृहात नेताना थेट महामार्गावरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हा प्रकार समोर येताच संतापलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलिस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलिस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. त्यानंतर आता गजा मारणेला पुणे पोलिसांनी आणखी एक दणका दिला आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजा मारणे टोळीच्या गाड्या जप्त केल्या आहेत.
गजा मारणे टोळीला पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा दणका दिला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या गाड्या जप्त केल्या आहेत. मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणे सह टोळीतील इतर सदस्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 टोयोटा फॉर्च्यूनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सन यासह आणखी 4 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेकडून टोळीतील सदस्यांच्या दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत पुणे पोलिसांनी 10 ते 15 गाड्या जप्त केल्या आहेत.
कुख्यात गुंड गजा मारणे पोलीस संरक्षणात असताना त्याचासोबत मटण पार्टी केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासोबतच चार पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोथरुडमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र, काही दिवसांनी त्याची रवानगी सांगली कारागृहात करण्याचा निर्णय घेतला. पोलीस संरक्षणात त्याला सांगलीला नेत असताना ‘कनसे ढाब्या’वर पोलिसांनी मटण पार्टी केली होती. याचा कानोसा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लागल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही चेक केले. त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला. सोबतच गजा मारणेला भेटायला दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीतून भेटायला आलेल्या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरूज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाने, पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल धुमाळ खुनाचा गुन्हा तर पांड्या मोहिते हा गजा मारणेच्या टोळीतील शूटर आहे. जुन्या गुन्ह्यांचा आधार घेत मारणेवर आणखी एक पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
गजा मारणेला भेटण्यासाठी आलेल्या साथीदारांवरही गुन्हा दाखल
गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहाकडे घेऊन जात असताना दोन फॉर्च्युनर आणि एका थार गाडीतून गजा मारणेच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर ढाब्यावर गाडी थांबल्यानंतर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या तिघांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये जेवण दिलं. त्यामुळे पोलिसांनी या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विशाल धुमाळवर खूनाचा गुन्हा दाखल आहे, तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारणेच्या टोळीचा शूटर म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
‘या’ गाड्या केल्या जप्त?
पोलिसांनी मारणेच्या दुचाकीसह अलिशान चारीचाकी गाड्यांचाही समावेश आहे. 2 टोयोटा फॉर्च्यूनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सन यासह आणखी 4 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेकडून टोळीतील सदस्यांच्या दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.
कोण आहे गजा मारणे?
– गजा मारणे पुण्यातील कुख्यात गुंड आहे.
– अमोल बधे आणि पप्पू गावडे यांचा खून झाला होता, या प्रकरणात गजा मारणेला अटक झाली होती. त्यामुळे तो 3 वर्षे येरवडा कारागृहात होता.
– मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून गजा मारणेची ओळख बनली आहे.
– गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
– मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
– जामीनानंतर काढलेली रॅली चर्चेत राहिली.
– आतापर्यंत 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे.
– आता सांगली कारागृहात आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.