अवैध दारुवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना सापडलं मोठं घबाड; बंद कपाटात आढळले तब्बल कोटभर रुपये
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैध दारु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले असता, तिथे दारुपेक्षा मोठी रोकड आढळून आली आहे. एका बंद कपाटात तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी काही संशयितांना घेतलं ताब्यात
दरम्यान, या प्रकाराची तात्काळ माहिती पोलिसांनी आयकर विभागाला दिली असून, इन्कम टॅक्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, रोकड नेमकी कुणाची आहे? कोणत्या कारणासाठी ठेवण्यात आली होती? आणि निवडणुकीशी याचा काही संबंध आहे का? याबाबतची सखोल चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Sangli Crime : सायबर चोरट्यांची नवी शक्कल, म्युल अकाउंटमधून मोठी सायबर लूट, 34 डेबिट कार्ड, 27 सिमसह सांगलीत संशयित अटकेत
आणखी वाचा
Comments are closed.