पुण्यातील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं, राजकीय वर्तुळा
पुणे: पुण्यात रेव्ह पार्टीनंतर आता पोलिसांनी जुगार अड्ड्यावरती मोठी कारवाई केली आहे. काल (सोमवारी) जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी (Pune Police) छापा टाकत कारवाई केली. यावेळी अड्ड्यावरती जुगार खेळताना एका भाजप (BJP) पदाधिकाऱ्याला पोलिसांनी (Pune Police) रंगेहाथ पकडलं आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह 2 ते 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याला पकडण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. (Pune Crime News)
जुगार खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेली जुगार खेळताना भाजपचा पदाधिकारी आढळून आला. जुगार खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आणि सहकारनगर पोलिसांनी ही छापेमारी केली होती, औदुंबर विठ्ठल कांबळे असे या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे याच्यासोबत इतर 2 ते 3 जण जुगार खेळत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे. कांबळे त्याच्या इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात रमी खेळत होता. यावेळी सहकार नगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनने छापा टाकला असता ते सर्वजण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डाव रंगात आला असतानाच पोलिस…
पोलिसांनी सांगितले की, औदुंबर कांबळे आपल्या इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात जुगार खेळत बसला होता. यावेळी सहकार नगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2ने छापा टाकला. त्यावेळी हे सर्वजण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. डाव रंगात आला असतानाच पोलिस त्याठिकाणी पोहचले आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाला. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.