‘आधी सारखं पुणे आता राहिलेल नाही’, स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी सांगितला पंधरा
पुणे: पुण्यात स्वारगेट येथे एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात घडलेल्या या प्रकरणाने पुणे हादरलं आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष देऊन पोलिसांना जाब विचारावा असे त्या म्हणाल्या आहेत. या घटनेने शहर हादरलं आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे. नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी लक्ष घालावं असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारेंनी सांगितला 15 वर्षांपुर्वीचा अनुभव
सुषमा अंधारेंनी या प्रकरणी बोलताना म्हणाल्या, पुणे स्वारगेट येथे घडलेली घटना फक्त संतापजनक नाही, तर चक्रावून टाकणारी आहे. पुण्यामध्ये मी गेली अनेक वर्ष वावरत आहे. पंधरा वर्षांपूर्वी असणार पुणे आणि आत्ताच पुणे यात प्रचंड मोठा फरक जाणवत आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी आम्ही शिवाजी बस स्टँडवरती उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली, तर रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तरी शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचे नंबर नोट करायचे. आपण सुरक्षितपणे घरी पोहोचेल ही महिलांना हमी होती. मात्र, ते वातावरण आता हळूहळू बदलत चाललं आहे. पुण्यातील कायदे व्यवस्थेवरची पकड हळूहळू सैल होत चाललेली आहे. पोलिसांचा धाक नावाची काही गोष्ट उरलेली नाही. वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो. पुण्यातील ज्या गर्दीच्या जागा आहेत. त्या ठिकाणी विशेषता शाळा, कॉलेज, बस स्टँड आणि रेल्वे स्टँड इथे पोलिसांची जास्तीची गस्त वाढवली पाहिजेत. मात्र, ते होताना दिसत नाही. आजची घटनाही फक्त गंभीर नाही. तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सर्व प्रकरणात पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचा नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
स्वारगेट अत्याचार प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, पुणे हे सुरक्षित राहिलेलं नाही. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. जिथे हजारो मुलं-मुली शिकण्यासाठी बाहेरून येतात. स्वारगेटच्या या एसटी स्टँड मध्ये ड्रग्स, पाकीट मार, मटका, दारूचे अड्डे चालतात. स्वारगेट एसटी स्टँड पासून पोलीस स्टेशन, एसीपी कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. पोलीस नक्की करतात तरी काय. गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे पुणे हे सुरक्षित राहिलेलं नाही. पोलीस बळ देखील वाढवण्याची गरज आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये – चाकणकर
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे, या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे. सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे. ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बसमध्ये नेलं आणि अत्याचार केला. ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे, तर अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. शासकीय यंत्रणा, चौकशी कक्ष हे मदतीला असतातच तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. मात्र, दुर्दैवाने या मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पुढे हा गंभीर आणि वेदनादायी प्रसंग घडला. पोलिसांनी आठ तपास पथक तयार केली आहेत, आठ तपास पथक या सगळ्याचा कालपासून तपास करत आहेत. आरोपीला लवकरच अटक होईल. मात्र, माझं आवाहन आहे की, तरुण मुलींनी, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. यंत्रणांची मदत घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आपण सतर्क रहावे. आता या प्रकरणात या पीडित मुलीच समुपदेशन व तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.