कोथरुडमधील प्रकरण तापलं, ‘त्या’ 3 तरुणींशी रुपाली चाकणकरांची चर्चा; नेमकं काय घडलं?
गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यात कोथरूड (Kothrud Crime News) पोलिसांकडून शिविगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप करून आंदोलन करणाऱ्या मुली अखेर रात्री साडेतीन वाजता परत गेल्या. मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही.
पीडित मुलींसह आमदार रोहित पवारांनी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
रूपाली चाकणकरांनीही घेतली दखल-
एबीपी माझाच्या बातमीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. कोथरुड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींना रुपाली चाकणकर यांनी फोन केला. तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती रूपाली चाकणकरांनी दिली.
रुपाली चाकणकरांची मुलींसोबत फोनवरुन चर्चा-
कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप मुलींनी केला. या बातमीची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. रुपाली चाकणकरांनी या मुलींना आणि त्यांचा सहकाऱ्यांना फोन करून सगळी माहिती घेतली आहे. सोबतच या प्रकरणासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना चौकशी किंवा माहिती घेण्यास सांगितली. 3 ऑगस्टला सकाळी 11 पासून या तीन मुली आणि त्यांचे सहकारी पुणे पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी दाद मागत होते. सोबतच पोलीस उपयुक्त संभाजी कदम यांच्याकडेदेखील याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती मात्र त्यांनी चौकशी करू, असं सांगितलं. आता रूपाली चाकणकरांच्या फोननंतर पोलीस नेमकं काय करतात हे पाहावं लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेत त्या मुलींशी फोनवरुन केली चर्चा करुन कारवाईचं आश्वासन दिलं आहे. रुपाली चाकणकर या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती आहे.
https://www.youtube.com/watch?v=ftqitmszlko
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.