तीन दलित मुलींच्या छळाचा आरोप; पुणे पोलीस आयुक्तालय पहाटे साडेतीनपर्यंत हायव्होल्टेज ड्रामा

गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली होती. काल या सगळ्याविरोधात पुण्यातील काही संघटना आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. मात्र, रविवारी रात्री पुण्यातील काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police) दाखल झाले. हे सर्वजण पुण्यातील पोलीस आयुक्तालयात रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते. अप्पर पोलीस आयुक्त  मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी या सगळ्यांची पहाटेपर्यंत चर्चा सुरु होती. तरीही पोलिसांनी अद्याप याप्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही. यानंतर रात्री साडेतीन वाजता आमदार रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, सहकारी आणि  या मुली आपापल्या घरी गेल्या. मात्र, पुण्यातील अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याप्रकरणात लक्ष घातल्याने मुलींचा छळ करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठीचा दबाव वाढला आहे. राज्य महिला आयोगानेही याप्रकरणाची दखल घेतल्यामुळे सोमवारी दिवसभरात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का, हे बघावे लागेल.

याप्रकरणी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Kothrud Police: कोथरुड पोलिसांनी आरोप फेटाळले

याप्रकरणातील तीन मुलींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आमच्याविषयी जातीवाचक आणि लैंगिक अपमान करणारी शेरेबाजी केली. तसेच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक कामठे यांनी एका मुलीच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणात तथ्य असेल तर कारवाई करु, असे सांगितल आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपयुक्त संभाजी कदम हे या प्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.

https://www.youtube.com/watch?v=URSKMCFI8WE

आणखी वाचा

तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां# आहात की लेस्बियन आहात? कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप

आणखी वाचा

Comments are closed.