शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला

पुणे: शहरात कोयता गँग आणि सराईत गुन्हेगारांचा धुमाकूळ वाढतच चालल्याचं चित्र दिसून येत आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर येथे एका १९ वर्षीय तरुणाची लोखंडी धारदार हत्याराने (Pune Crime News) सपासप वार करून निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.(Pune Crime News)

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.१६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील अरविंद सोसायटीजवळील परिसरात थांबला होता. यावेळी तीन हल्लेखोर त्या ठिकाणी आले. काही कळण्याच्या आतच त्यांनी आपल्याजवळील लोखंडी धारदार हत्याराने करणवरती हल्ला चढवला.(Pune Crime News)

हल्लेखोरांनी करणच्या शरीरावर वर्मी घाव घातल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत करण काशीद आणि आरोपींमध्ये पूर्वीचा वाद होता. याच वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.(Pune Crime News)

आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पथकासह घटनास्थळाची माहिती पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.(Pune Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.