पुण्यातील हडपसरमधील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्बसदृश्य वस्तूमुळे खळबळ; CCTV फुटेज समोर येत

पुणे बातम्या: पुणे हडपसर परिसरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये (Ushakiran Hospital in Hadapsar) बाथरूममध्ये टायमर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने गुरुवारी सायंकाळी मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयास्पद वस्तू सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन मोकळ्या मैदानात नष्ट केली. त्यामुळे संभाव्य धोका टळला. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सातच्या सुमारास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील बाथरूममधील बेसिनखाली ही संशयास्पद वस्तू ठेवण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून येऊन बाथरूममध्ये ही वस्तू ठेवताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

नेमकं काय घडलं? (Ushakiran Hospital in Hadapsar)

दरम्यान, बाथरूममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ही वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली. डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या वस्तूला चार जिलेटिन कांड्या, घड्याळाच्या स्वरूपातील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचे दिसून आले. टायमरवर 7.21 अशी वेळ दिसत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टर गायकवाड यांनी हॉस्पिटलमधील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून धाडस दाखवत ती वस्तू स्वतः हाताने उचलून एका बॉक्समध्ये ठेवली आणि हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत हलवली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू- (हडपसर येथील उषाकिरण हॉस्पिटल)

माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बॉम्ब सूट परिधान करून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आणि ग्लायडिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या मैदानात नेऊन नियंत्रित पद्धतीने नष्ट केली. या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Accident News: बोरघाटात थरारक अपघात! पुणे-मुंबई महामार्गावर मिनी बस उलटली; घटनास्थळी गोंधळ, मदतीसाठी आरडाओरडा अन्…

आणखी वाचा

Comments are closed.