कोंढव्यातील अत्याचाराचा आरोप केलेल्या पिडीतेनं आरोपीचा फोटो पाहून दोन मिनिटं घेतला पॉझ, तेच हेर
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील ज्या घटनेनं राज्यभरात चर्चा झाली त्या घटनेमध्ये मोठा ट्वीस्ट आला. संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील (Pune Crime News) पीडितेने सांगितलेला ‘कुरिअर बॉय’ हा प्रत्यक्षात तिचाच मित्र असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. काल (शुक्रवारी, ता 4) या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. त्याचबरोबर तरूणीने केलेले काही आरोप देखील खोटे असल्याचं समोर आलं आहे. घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झालेला नाही. त्याचबरोबर, तरुणीच्या मोबाइलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला असून, त्या खाली लिहिलेला मेसेजही तरुणीनेच एडीट करून लिहिल्याची कबुली दिली आहे, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. या घटनेनं खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या तपासामध्ये प्रकरण पुर्णपणे उलटं फिरल्यानं आता चर्चांना उधाण आलं आहे.(Pune Crime News)
पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण देखील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करतो. तो गेल्या वर्षभरापासून तरूणीच्या संपर्कामध्ये होता. दोघांची ओळख समाज मेळाव्यात झालेली होती. त्यांचा एकमेकांशी फोन आणि सोशल मीडियावर सतत संपर्क सुरू होता. तो तिच्या घरी येत-जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. इतकेच नव्हे; तर तो अनेकदा तिच्या घरी ‘फूड डिलिव्हरी अॅप’वरून तिच्यासाठी खाद्यपदार्थ ऑर्डर करून पाठवत होता.
फोटो दाखवल्यानंतर तिने ओळख नाकारली
घटनेच्या दिवशी तो सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत येताना दिसला आणि पावणेनऊच्या सुमारास बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी त्याचा फोटो तिला दाखवला असता तरुणीने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले होते. मात्र, ती काही वेळ स्तब्ध झाली. ‘तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला?’ असा प्रश्नही तिने पोलिसांना केला. ओळखत नाही, हे उत्तर देण्यापूर्वी एक ते दोन मिनिटे ती स्तब्ध झाली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. तांत्रिक तपासात स्पष्ट झाले, की आरोपी तरुण तिच्याच बोलावण्यावरून घरी आला होता.
ती दीड मिनिटे स्तब्ध अन् पोलिसांनी तेच हेरलं
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुळीक आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणातील आरोपीचा तरुणाचा छडा लावला. त्याचा फोटो शोधून काढला. वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनासाठी तरुणीला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास आले होते. यावेळी वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी तेथे उपस्थित होत्या. तरुणीला तरुणाचा फोटो ज्यावेळी पोलिसांनी दाखवला त्यावेळी तिने दीड मिनिटे ती स्तब्ध झाली होती. तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला, असा प्रश्न तिने पोलिसांना केला. त्यानंतर हा तो व्यक्ती नाही, असे तिने सांगितले. एसीपी मुळीक यांच्या नजरेनं तिचे खोटं बोलणं हेरलं होतं. त्यानंतर आता अनेक गोष्टीचा खुलासा झाला आहे.
500 सीसीटीव्ही कॅमेरे
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांसमोर देखील खऱ्या अर्थाने या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले होते. दिवस-रात्र 500 पोलिसांनी तपास करून अखेर तिच्या घरी आलेल्या तरुणाला शोधून काढले. त्यासाठी कोंढव्यातील त्या सोसायटीच्या गेटपासून ते बाणेरपर्यंतच्या परिसरातील तब्बल 500 सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले होते. तरुणीच्या घरी आलेल्या तिच्या मित्राचा फोटो सोसायटीतील कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याच फोटोचा दुवा पकडून पोलिसांनी त्या तरुणाला शोधून काढले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे ज्या दिवशी तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याचा दावा केला, त्या दिवशी तो तरुण तिच्या सोसायटीत आल्याचे निष्पन्न झाले.
आणखी वाचा
Comments are closed.