दारूच्या नशेतच दोघांचा वाद; मुलानंच बापावर पेट्रोल टाकलं अन्…; आग विझवली पण वडिलांचा दुर्दैवी
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारूच्या नशेत मुलाने आपल्या वडिलांनाच (Pune Crime News) पेटवून देऊन खून केल्याचा संतापजनक प्रकार दांडेकर पूल परिसरात घडला आहे. यासंदर्भात पर्वती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.(Pune Crime News)
दोघांनाही दारूचे व्यसन
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र उद्धव भालेराव (६१, रा. सर्व्हे क्र. १३० दांडेकर पूल) असे मृताचे नाव आहे. त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून (Pune Crime News) त्यांचा मुलगा सागर (२८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालेराव सुतारकाम करून आपलं घर चालवक होते. त्यांचा मुलगा सागर हा देखील छोटी मोठी कामे करायचा. दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत असताना शनिवारी (दि. ७) दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.(Pune Crime News)
पन्नास टक्के भाजले असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट
या घटनेत भालेराव गंभीर रीत्या भाजले गेले. आग भडकल्याने सागरने आग आटोक्यात आणून त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. ते पन्नास टक्के भाजले असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री (Pune Crime News) भालेराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.(Pune Crime News)
घटनेनंतर पर्वती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात घरगुती वादातूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले असले तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपी सागरला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. घटनेच्या वेळी तोही मद्यधुंद अवस्थेत होता, त्याचवेळी बाप लेकामध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.(Pune Crime News)
दरम्यान, वडिलांवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या या घटनेमुळे दांडेकर पूल परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेजाऱ्यांनीही या कुटुंबात वारंवार वाद होत असल्याचे सांगितले आहे. व्यसनाधीनतेतून कुटुंबातील नातेसंबंध कसे ताणले जातात आणि त्यातून टोकाचे प्रकार कसे घडतात, याचे हे धक्कादायक उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.(Pune Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.