धक्कादायक! पुण्यातील सहकार नगर हादरलं! दोन तरुणांनी केला गोळीबार, एक जण गंभीर जखमी

गुन्हे बातम्या ठेवा: पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सहकार नगर भागात असलेल्या शिंदे हायस्कूलच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. रात्री दहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी एका मेडिकलच्या बाहेर थांबलेल्या व्यक्तीवर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या.  या घटनेत संबंधित तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जवळील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार झाला असल्याचा प्राथमिक अंदाज

पुण्यातील सहकार नगर भागात असलेल्या शिंदे हायस्कूलच्या परिसरात दोन जणांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या गोळीबाराच्या घटनेमध्ये  तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

धुळे शहरातील गुरुद्वारा परिसरात शीख धर्मीय बांधवांच्या दोन गटात तुफान राडा

धुळे शहरातील गुरुद्वारा परिसरात शीख धर्मीय बांधवांच्या दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडलीय. तीच घटना रविवारी च्या रात्री घडली आहे. या घटनेत दोन्ही गटाकडून दगडफेक देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यावेळी गोळीबार देखील झाल्याची माहिती आहे. दरम्यानघटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. धुळ्यातील गुरुद्वारात गुरुगोविंद सिंग यांची जयंती साजरी होणार होती. याच पार्श्वभूमीवर गुरुद्वाराचे उत्तर अधिकारी नेमण्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. त्यावरूनच दोन गटात वाद होऊन हि कार्यक्रम घडल्याची माहिती आहे. बाबा धीरज सिंग यानच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना उत्तराधिकारी नेमण्याची मागणी स्थानिक शीख धर्मीय बांधवांकडून करण्यात आली होती.

गोंदिया जिल्ह्यात धक्कादायक घटना

गोंदिया जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात फिरायला गेलेल्या दोघांचा नाव उलटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहित रहांगडाले व कुणाल भोडे रा. बरबसपुरा अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. या घटनेमुळं परिसरारात हळहळ व्यक्त केली जात आहे.  9 मुलं ही बोदलकसा जलाशय परिसरात फिरायला गेली असता तिथं मच्छीमारांची नाव होती. दरम्यान या मुलांनी ती नाव पकडून जलाशयात नौकाविहार करायला सुरुवात केली. मात्र जलाशयाच्या थोड्या अंतरावर जाताच ही नाव उलटल्याने यात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य 7 जण थोडक्यात बचावले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये धक्कादायक घटना, जगबुडी नदीच्या डोहात बुडून तीन सख्ख्या भावांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खेड मधील जगबुडी नदीच्या डोहात तिघेजण बुडाले आहेत. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विचित्र घटनेने खेडमध्ये खळबळ उडाली आहे. खेड आणि भोस्ते गावच्या दरम्यान जगबुडी नदीच्या डोहात पोहायला गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाल्याची माहिती मिळाली आहे. खेड पोलिस घटस्थळी रवाना झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Bihar Crime News: तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी जेल, नेमकं प्रकरण काय?

Comments are closed.