लग्नाची बोलणी सुरु असताना दोघांचं जुळलं; मैत्री अन् शरीरसंबंध, बोलणी फिस्कटली, तरूणीचं दुसरीकडे

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूण आणि तरूणीच्या घरच्यांची लग्नाची बोलणी सुरू असतानाच या दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर ते दोघे फिरायला गेले, त्याचवेळी दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले. पण इकडे दोघांच्या घरच्यांची लग्नाची बोलणी फिस्कटली आणि त्याचं जमत असलेलं लग्न मोडलं. त्यानंतर तरूणीचं तिच्या घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी विवाह ठरवला. याची माहिती समजताच तरूणाने त्या तरूणीला ब्लॅकमेल करायला आणि त्रास द्यायला सुरूवात केली. तिला दोघांमध्ये झालेल्या शरीर संबंध आणि दोघांचे त्याने बनवलेले व्हिडीओ तिच्यासोबत ठरलेल्या मुलाला देखील दाखवले, त्यानंतर तरूणीचं जुळलेलं लग्न मोडलं, पुण्यातील या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

एका तरुणाने मैत्रीच्या आड लपवून केलेल्या विश्वासघातामुळे एका तरुणीचे ठरलेले लग्न मोडले असून, या प्रकरणात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनयभंग, बदनामी, छेडछाड आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुण यांची पूर्वी लग्नासाठी बोलणी सुरू होती. त्यावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि फिरायला गेल्यावर त्यांच्या परस्पर संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र नंतर काही कारणांमुळे हे नातं तुटलं आणि तरुणीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरलं.

तरुणीसोबतचे गुपचूप चित्रीकरण केलेले शारीरिक संबंधाचे व्हिडीओ

ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित आरोपीने नव्या ठिकाणी ठरलेल्या वरास भेट घेतली आणि त्याच्यासमोर तरुणीसोबतचे गुपचूप चित्रीकरण केलेले शारीरिक संबंधाचे व्हिडीओ दाखवले. हे पाहून त्या तरुणाने त्यांचं जुळलेलं लग्न तातडीने मोडलं. तरुणीने यानंतर थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आपल्या तक्रारीत सांगितले की, आरोपीने विश्वासघात करून तिच्या संमतीशिवाय व्हिडीओ चित्रीकरण केले, त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि समाजात तिची बदनामी केली. यासोबतच लग्न मोडण्यासाठी पद्धतशीरपणे कट रचल्याचा आरोपही तिने केला आहे.पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकारामुळे विश्वास आणि गोपनीयतेचा गैरवापर किती गंभीर परिणाम घडवू शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.