फरार गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या नावे सीमकार्ड घेत बँक खात्यातून फसवणूक


Nilesh Ghaywal Case पुणे : शहरातील कोथरुड (Pune) येथे गेल्या महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ गँग चांगलीच चर्चेत आली, तर गुंड निलेश घायवळच्याही (Nilesh Ghaywal) मागे पोलिसांचा ससेमिरा लागलाय. मात्र, असे असताना आता निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे. ‌कोथरुडमधील मोबाईल दुकानदाराला धमकाऊन त्याच्या नावावर सीम कार्ड (SIM Cards) घेतल्याचे प्रकरण समोर आलं आहे. शिवाय त्या सीम कार्डचा उपयोग घायवळने वेगवेगळ्या बँकमधे (Bank) अकाउंट्स उघडण्यासाठी आणि केवायसीसाठी केला. 13 जानेवारी 2020 ला निलेश घायवळने पुण्याच्या कोथरुड भागातील डहाणूकर कॉलनीतील एका मोबाईल दुकानदाराकडे व्हीआयपी मोबाईल नंबरची मागणी केली. हा नंबर घायवळला त्या दुकानदाराच्या नावावर हवा होता.

Nilesh Ghaywal Case : मोबाईल दुकानदाराची घायवळच्या विरोधात तक्रार, गुन्हा दाखल

दरम्यान, दुकानदाराने सुरूवातीला नकार दिल्यानंतर घायवळने त्या दुकानदाराला शिवीगाळ करुन धमकावले. त्यानंतर दुकानदाराने त्याचे आधारकार्ड वापरुन मीळलेले सीमकार्ड घायवळला दीले. त्या सीमकार्ड आणि मोबाईल नंबरचा उपयोग करुन घायवळने स्वतःच्या नावाने आणि पृथ्वीराज एंटरप्रायजेस आणि समृध्दी एग्रो या कंपन्यांच्या नावावर बँक अकाउंट्स उघडली. मोबाईल दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलीसांनी घायवळच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय‌. सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.

Nilesh Ghaywal : नेमकं प्रकरण काय?

ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराला पुण्यातील कोथरूड परिसरामधील मुठेश्वर चौकात घडली होती, तक्रारदार मित्रांसमवेत गप्पा मारत असताना, घायवळ टोळीतील गुंड दुचाकीवरून जात होते. त्यांना जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणांवरून भांडणे झाली. त्यातून आरोपींनी धुमाळ यांना मारहाण केली. त्यापैकी एकाने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर काही वेळाने आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार केले. आम्ही या भागाचे भाई आहोत, असे म्हणून आरोपींनी दहशत माजवली, असे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घायवळ टोळीच्या सदस्यांसह टोळीच्या म्होरक्यावरती देखील मकोका अंतर्गत कारवाई केली. यादरम्यानच्या तपासात टोळीप्रमुख निलेश घायवळ फरार असून, तो परदेशात पळून गेला असल्याचं समोर आलं. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे. त्याच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.